AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना लसीवर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य, कोरोना प्रमाणपत्र सर्वमान्य करुन परदेश प्रवास सुलभ करण्याची गरज

भारतात आतापर्यंत 80 कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत, आणि 20 कोटी लोकांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारताने 95 देशांना कोरोना लसींचा मोठा साठा पुरवला.

कोरोना लसीवर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य, कोरोना प्रमाणपत्र सर्वमान्य करुन परदेश प्रवास सुलभ करण्याची गरज
कोरोना लसीच्या प्रमाणपत्रांना सार्वत्रिक मान्यता देणं गरजेचं आहे- पंतप्रधान मोदी
| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 2:21 PM
Share

वॉशिंग्टन: क्वाड देशांच्या संमेलनात पंतप्रधान मोदींनी कोरोना लसीकरण प्रमाणपत्राचा (Covid-19 Vaccinations) मुद्दा उपस्थित करत, प्रमाणपत्रांना सार्वत्रिक मान्यता दिली पाहिजे ही मागणी केली. परदेश प्रवास करताना सध्या कोरोना प्रमाणपत्राची गरज लागते, मात्र जगातील बऱ्याच लसी अशा आहेत, ज्यांना जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप मान्यता दिलेली नाही, या प्रकरणांमध्ये नागरिकांना परदेश प्रवास करण्यात अडचण निर्माण होते, याच मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी (Prime Minister Narendra Modi) बोट ठेवलं.  ( Prime Minister Modi’s address at the International Corona Summit in the United States, Demand for universalization of the Corona Vaccine Certificate)

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी हे संमेलन ( Global COVID-19 Summit) आयोजित केलं आहे. या संमेलनात एक व्हिडीओ संदेश पाठवत मोदींनी आपली मतं मांडली. मोदी म्हणाले की, भारत सध्या लसींचं उत्पादन वाढवत आहे, लसींचं उत्पादन वाढवल्यानंतर भारत इतर देशांना लसींचा पुरवठा करु शकतो, मात्र त्यासाठी भारताला कच्चा माल वेळेत आणि मुबलक प्रमाणात मिळायला हवा. सध्या कच्च्या मालाचा पुरवठा अनियमित असल्याचंही मोदींनी सांगितलं.

परदेश प्रवास सुलभ बनवण्याची गरज

मोदी म्हणाले की, आपल्याला आता कोरोनाच्या आर्थिक परिणामांचाही विचार करण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्याला कोरोना लसीच्या प्रमाणपत्रांना सार्वत्रिक मान्यता देणं गरजेचं आहे. मोदींचं हे वक्तव्य त्यावेळी आलं आहे, जेव्हा ब्रिटन सरकारने भारतात बनलेल्या कोविशिल्ड लसीच्या प्रमाणपत्राला मान्यता दिली आहे. मात्र, भारताला त्या 18 देशांच्या यादीतून बाहेर ठेवलं आहे, जिथल्या लसींना ब्रिटनमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

म्हणजेच, भारतातील नागरिकांनी लस घेतली असेल, तरी त्यांनी लस न घेतलेल्या प्रवाशांच्या नियमांचं पालन करावं लागेल. भारतात लसीकरण झालेल्यांनाही ब्रिटनमध्ये गेल्यानंतर क्वारंटाईनमध्ये राहावं लागतं. नवीन कोरोना नियम इथं 4 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

विशेष गोष्ट म्हणजे, अमेरिकेने सोमवारी नवीन प्रवास नियमावली जारी केली, ज्यात लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांना नोव्हेंबर महिन्यापासून अमेरिकेत प्रवेश दिला जाणार आहे. कोरोना संकटादरम्यान, तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी नागरिकांच्या अमेरिकेत येण्यावर बंदी घातली होती.

लसींचं उत्पादन वाढवण्याची गरज

मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं की, भारतात सध्या लसींचं उत्पादन वाढवण्यावर भर दिला जातो आहे. त्यात अजून ज्या नव्या लसी विकसित होती, त्यांचीही क्षमता वाढवण्यावर आमचा भर असेल. उत्पादन वाढल्यानंतर आम्ही कोरोना लसींच्या निर्यातीला पुन्हा सुरुवात करु, पण त्यासाठी कच्च्या मालाचा पुरवठा सुरळीत राहणं गरजेचं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाची परिस्थिती अतिशय खराब झाली, हेच पाहता भारताने कोरोना लसींची निर्यात बंद केली होती.

पुढं मोदी म्हणाले की, आम्ही क्वाड देश मिळून हिंदी आणि पॅसिफिक महासागर क्षेत्रातील लस निर्मिती क्षमता वाढवत आहोत. हेच नाही तर भारताने दक्षिण आफ्रिकेसोबत कोरोना औषध आणि लस निर्मितीतील बौद्धिक संपदा वाटण्याचा प्रस्ताव केला आहे. यामुळे कोरोना संकटाचा सामना आपण अधिक चांगल्या रितीन करु शकू

भारताची लसीकरण मोहिम सुरु

मोदी म्हणाले की, भारत नेहमी मानवतेचा पाठिराखा राहिला आहे. त्याने जगाला एक कुटुंब म्हणूनच पाहिलं आहे. त्यामुळेच देशात सध्या स्वस्त वैद्यकिय उपकरणं, औषधं, पीपीई कीटचं उत्पादन सुरु केलं. यामुळे विकासशील आणि गरीब देशांना स्वस्त पर्याय उपलब्ध झाले. मोदी म्हणाले की, भारतात सध्या जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका दिवसांत भारतात अडीच कोटी डोस देण्यात आले. मोदी त्यांच्या वाढदिवशी करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेचा उल्लेख करत होते.

मोदी पुढे म्हणाले की, भारतात आतापर्यंत 80 कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत, आणि 20 कोटी लोकांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारताने 95 देशांना कोरोना लसींचा मोठा साठा पुरवला. हेच नाही तर मेडिकल सामग्री आणि औषधांचा 150 देशांना पुरवठा केला.

दुसऱ्या देशांचे मोदींकडून आभार

कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेत भारत संकटात सापडला. त्यावेळी जगभरातील देशांनी भारताला मदतीचा हात दिला. याबद्दल मोदींनी सगळ्या देशांचे आभार मानले. ते म्हणाले की, जेव्हा आम्ही दुसऱ्या लाटेशी लढत होतो, तेव्हा जग एका कुटुंबासारखं आमच्यासोबत उभं राहिलं.

भारताने सोमवारी वॅक्सिन मैत्रीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुसार कोवॅक्स अभियानांतर्गत पुन्हा एकदा भारताकडून जगाला लसींचा पुरवठा केला जाणार आहे. मात्र असं असलं तरी भारतातील लोकांचं लसीकरण हीच प्राथमिकता असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं.

भारत सरकार ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोरोना लसीचे तब्बल 30 कोटीहून अधिक डोस आणि पुढच्या 3 महिन्यात 100 कोटी लसी उपलब्ध करुन देणार आहे. देशात कोरोना लसींचे 83 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत, त्यातील 10 कोटीहून अधिक डोस हे गेल्या 11 दिवसांत देण्यात आले आहेत.

हेही वाचा:

पाक-चीनला धडकी, अमेरिकेकडून भारत 30 प्रेडिएटर ड्रोन विकत घेणार, मोदींची ड्रोन निर्माता कंपनीच्या CEOसोबत बैठक

MODI US Visit : आधी उद्योगपतींची भेट, नंतर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत बैठक, असा असेल पंतप्रधान मोदींचा US दौऱ्यातील पहिला दिवस!

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.