पाक-चीनला धडकी, अमेरिकेकडून भारत 30 प्रेडिएटर ड्रोन विकत घेणार, मोदींची ड्रोन निर्माता कंपनीच्या CEOसोबत बैठक

PM Narendra Modi US Visit : पंतप्रधान मोदी ड्रोन बनवणाऱ्या कंपन्यांनी CEOसोबत बैठक करणार आहेत. जनरल एटॉमिक्स (General Atomics) नावाची ही कंपनी आहे

पाक-चीनला धडकी, अमेरिकेकडून भारत 30 प्रेडिएटर ड्रोन विकत घेणार, मोदींची ड्रोन निर्माता कंपनीच्या CEOसोबत बैठक
प्रेडिएटर ड्रोन हा सध्या जगातील सर्वात अत्याधुनिक सैन्य ड्रोन समजला जातो.

वॉशिंग्टन: भारताची सैन्य क्षमता आता अजून वाढणार आहे. त्यासाठी अमेरिका दौरा महत्त्वाचा आहे, कारण या दौऱ्यात काही महत्त्वाच्या संरक्षण डील होण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन ( 30 Predator drones) खरेदी करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi ) ड्रोन बनवणाऱ्या कंपन्यांनी CEOसोबत बैठक करणार आहेत. जनरल एटॉमिक्स (General Atomics) नावाची ही कंपनी आहे, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी 4 टॉप कंपन्यांच्या सीईओंशी थेट भेट घेणार आहे, कारण, ज्या कंपनीचे ते नेतृ्त्त्व करतात, त्या कंपन्या जगात सर्वात पुढे आहेत. ( India to buy 30 Predator armored drones from US Modi meets CEOs of drone maker General Atomics )

सध्या मिळालेल्या माहितीनुसार, Apple कंपनीचे सीईओ टिम कूक (Apple CEO Tim Cook) हेही या बैठकीत भाग घेणार होते, मात्र आरोग्य विषयक कारणांमुळे ते याबैठकीला हजर राहू शकणार नाही. दरम्यान, ज्या सीईओंसोबत मोदींची बैठक होणार आहे, त्यांनी भारतात गुंतवणूक केली तर, भारत अनेक बाबतीत प्रगती करु शकतो. (Global Resilient chain) यातील काही कंपन्या सोलार उर्जा निर्मिती करणाऱ्या आहेत, काही संरक्षण साहित्य निर्मिती करणाऱ्या तर काही रोजगार निर्मिती करणाऱ्या आहे.

अमेरिकेसोबत संरक्षण कराराची योजना

अफगाणिस्तानातील परिस्थिती, पाकिस्तानचे भ्याड हल्ले आणि चीनच्या कुरघोड्या पाहता आता भारत (India)आता आपली सैनिकी शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळेच भारताने आता तब्बल 30 सशस्र ड्रोन (Drone) खरेदीची योजना तयार केली आहे. यासाठी 3 अब्ज डॉलर म्हणजेच तब्बल 22 हजार कोटी रुपये लागणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत तिन्ही सैन्यदलांसाठी 10-10 एमक्यू-9 रिपर ड्रोन विकत घेण्याची योजना तयार करत आहे.

27 तास हवेत उड्डाण घेऊ शकणारा ड्रोन

प्रेडिएटर ड्रोन हा सध्या जगातील सर्वात अत्याधुनिक सैन्य ड्रोन समजला जातो. भारतीय सैन्यात या ड्रोनच्या येण्यानं, आपली ताकद कमालीची वाढणार आहे. हे सगळे मानवरहित ड्रोन असल्याने, सैनिकांच्या जीवितहानीची शक्यता नसते. हा ड्रोन हार्ड प्वाईंटसोबत येतो, ज्यात हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईल्स लावता येतात. शिवाय सेंसर आणि लेजर गायडेड बॉम्बचाही या ड्रोनद्वारे शत्रूवर हल्ला करता येतो. यूएवी 50,000 फूटांवरूनही संचालित केला जाऊ शकतो आणि हा ड्रोन शत्रूच्या नजरेत न येता तब्बल 27 तास हवेत राहू शकतो. या ड्रोनद्वारे हेरगिरी करता येते, विमानांवर लक्ष्य ठेवता येतं आणि प्रसंगी हल्लाही करता येतो.

हेही वाचा:

MODI US Visit : आधी उद्योगपतींची भेट, नंतर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत बैठक, असा असेल पंतप्रधान मोदींचा US दौऱ्यातील पहिला दिवस!

PM Narendra Modi US visit : एअरपोर्ट ते हॉटेलपर्यंत पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत, पाहा 5 फोटो

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI