Putin India Visit : व्लादिमीर पुतिन यांच्या मुली काय करतात ? कसं आहे सीक्रेट लाईफ ?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. त्यांच्या मुलींचे गुप्त जीवन, शिक्षण आणि करियर नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. पुतिन कुटुंबीयांच्या गोपनीयतेमुळे त्यांच्याबद्दलची माहिती नेहमीच गूढ राहिली आहे. ती जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केले. सध्या संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर आणि मोदी-पुतिन यांच्या भेटीवर खिळलेल्या आहेत. पुतिन यांचं राजकारण, त्यांचे निर्णय हे चर्चेत असतातच, पण तितकंच कुतूहल लोकांना त्यांचं खासगी आयुष्य, कुटुंब आणि मुलींबद्दलही आहे, पुतिन यांच्या मुलींच्या सीक्रेट लाईफबद्दलही अनेकांच्या तोंडी चर्च असतेच.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष असलेले पुतनि हे त्यांच खासगी आयुष्य खूप जपतात, अगदी प्रायवह्टे ठेवतात, त्यामुळे त्यांच्यबद्दल जी काही माहिती मिळेल, जे समोर येईल, ते जाणून घेण्यास सगळेच उत्सुक असतात. पुतिन यांना किती मुली आहेत, त्या काय करतात, कशा राहतात, कसं आयुष्य जगतात ? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात घोळत असतात.
कोण आहेत पुतिन यांच्या मुली ?
वेगेवगळ्या रिपोर्ट्सनुसार, रशियचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्यांची पहिली पत्नी ल्यूडमिला ओचेरत्नाया यांच्या दोन मुली आहे. मारिया वोरोत्सोवा असं मोठ्या मुलीचं नाव आहे तर कॅटरीना तिखोनोवा ही धाकटी मुलगी आहे. या दोघीही लहानपणापासूनच पुतिन यांच्या संरक्षणाखाली जगत होत्या, त्यामुळे त्यांना कधीही उघडपणे शाळेत जाता आलं नाही किंवा सार्वजनिक आयुष्यातही त्या खूप दिसल्या नाहीत. एवढंच नव्हे तर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांची ॲडमिशनदेखील खोट्या नावाने झाली. पुतिन स्वतः म्हणतात, “दोघींचेही शिक्षण रशियात झाले होते आणि त्या मॉस्कोमध्ये राहतात.” त्यांचे बालपण अंगरक्षक आणि सुरक्षारक्षकांच्या सभोवतालीच गेलं. एका मुलाखतीमध्ये पुतिन यांनी सांगितलं होतं की, ‘मला नातवंडं आहेत, पण त्यांनी सामान्य जीवन जगावं अशी माझी इच्छा आहे.’
पुतिन यांची मुलगी मारिया करते तरी काय ?
पुतिन यांची मोठी मुलगी मारिया हिने मेडिसिनमध्ये (एमबीबीएस) पदवी घेतली आहे. ती वैद्यकीय संशोधनातही तज्ज्ञ आहे. अनेक प्रमुख आरोग्यसेवा प्रकल्पांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संशोधन गटांमध्ये ती सहभागी आहे.रॉयटर्स नुसार, मारिया ही अब्जाधीश बिझनेसवुमन आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी ती फील्ड हॉस्पिटलमध्ये जाताना दिसली. मारिया विवाहित आहे आणि तिला मुलं आहेत. पण ती सार्वजनिक जीवनापासून दूर राहून शांत आणि साधी जीवनशैली जगते.
कॅटरिना काय करते ?
तर पुतिन यांची धाकटी मुलगी, कॅटरिना ही म्हणजे अतिशय वेगळं व्यक्तिमत्व आहे. ती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध रॉक-एन-रोल डान्सर आहे आणि तिने अनेक जागतिक नृत्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. कॅटरिना हिने विज्ञान आणि तंत्रज्ञानात करिअर केले आहे. रशियातील मोठ्या रिसर्च आणइ हाय-टेक युनिव्हर्सिटीजमध्ये तिने नेतृत्व केलं आहे. रशियामध्ये ती टेक-इनोवेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देते आणि अनेक सरकारी संशोधन कार्यक्रमांमध्ये सहभागी असते. तिचं लग्न झालं असून मुलंही आहेत. ती तिचं सोशल लाईफ खूप प्रायव्हेट ठेवते.
पुतिना यांना तिसरी मुलगीही आहे ?
अनेक मीडिया रिपोर्ट्समधून असा दावा केला जातो की पुतिन यांना आणखीही एक (तिसरी) आहे, एलिजावेटा ओलेगोवना असं तिचं नाव आहे. तिला पुतिन यांची सीक्रेट लेक म्हटलं जातं. 22 वर्षांची एलिजावेटा ओलेगोवना ही पॅरिसमध्ये राहते असं म्हटलं जातं. युक्रेनचं युद्ध सुरू झाल्यावर तिने तिचं सोशल मीडिया अकाऊंट बंदकेलं जातं, असं म्हटलं जातं. पण पुतनि यांनी कधीच या दाव्याची पुष्टी केलेली नाही.
