ट्रम्प यांनी गरळ ओकली! पण अमेरिकेच्या या नेत्याने जिंकलं मन, म्हणाला, मी राष्ट्रपती बनलो तर भारतासोबत…

इमॅन्युएल म्हणाले की, ट्रम्प यांची भाषा आणि वृत्ती अमेरिकेच्या अनेक मित्र राष्ट्रांना दुरावत आहे. भारत, जपान आणि कोरियासारखे प्रमुख भागीदार देशसुद्धा त्यांच्या धोरणांबद्दल अस्वस्थ आहेत.

ट्रम्प यांनी गरळ ओकली! पण अमेरिकेच्या या नेत्याने जिंकलं मन, म्हणाला, मी राष्ट्रपती बनलो तर भारतासोबत...
Rahm Emanuel
Image Credit source: AP News
| Updated on: Apr 23, 2026 | 6:52 PM

अमेरिकेचे माजी राजदूत रेहम इमॅन्युएल यांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका केली आहे. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भारत-अमेरिका संबंध कमकुवत झाले असून, आपण सत्तेत आल्यास हे संबंध पुन्हा दृढ करण्याच्या दिशेने काम करू, असे त्यांनी म्हटले आहे.

भारत-अमेरिका संबंधांवर ट्रम्प यांच्या धोरणांची टीका

एका मुलाखतीत भारत-अमेरिका संबंधांवर भाष्य करताना इमॅन्युएल म्हणाले की, ट्रम्प प्रशासनाच्या काळात अमेरिकेने भारताला दूर ढकलले. गेल्या 30 वर्षांत प्रत्येक अमेरिकन राष्ट्रपतींनी भारताला जवळ आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ट्रम्प यांनी या प्रयत्नांचे नुकसान केले, असा आरोप त्यांनी केला.

सहयोगी देशांशी अंतर वाढल्याचा दावा

इमॅन्युएल यांच्या मते, ट्रम्प यांची भाषा आणि वागण्यामुळे अमेरिकेचे अनेक मित्र देश त्यांच्यापासून दूर जात आहेत. भारत, जपान आणि कोरिया यांसारखे महत्त्वाचे भागीदार देशही ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अस्वस्थ आहेत.

राष्ट्रपती निवडणुकीची तयारी आणि मोठे विधान

डेमोक्रॅटिक नेते इमॅन्युएल यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे कारण ते आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या तयारीत आहेत. इलिनॉयचे माजी प्रतिनिधी राहिलेले इमॅन्युएल २०२८ च्या निवडणुकीत उतरण्याच्या शक्यतेमुळे चर्चेत आहेत.

पाकिस्तानबाबत ट्रम्प यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

इमॅन्युएल यांनी ट्रम्प प्रशासनाच्या भारत-पाकिस्तान धोरणावरही प्रश्न उपस्थित केले. ट्रम्प यांनी अनेक प्रसंगी भारताऐवजी पाकिस्तानच्या बाजूने झुकते माप दाखवले, जे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणासाठी योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

भारत-पाक तणावादरम्यानच्या वक्तव्यावर टीका

भारत आणि पाकिस्तान दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या लष्करी तणावानंतर ट्रम्प यांनी केलेल्या विधानांवरही इमॅन्युएल यांनी नाराजी व्यक्त केली. ट्रम्प यांची विधाने भारताच्या भूमिकेच्या विरुद्ध होती, ज्यामुळे नवी दिल्लीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली, असे त्यांनी नमूद केले.

Follow Us