डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराणचे धक्कादायक पाऊल, इराणी संसदेत येणार प्रस्ताव

इराणच्या संसदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हत्येच्या बदल्यात 50 मिलियन युरोचे इनाम देण्याचा प्रस्ताव येऊ शकतो असे म्हटले जात आहे. इराणच्या मीडियातील वृत्तानुसार संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी 'काऊंटर एक्शन'च्या योजनेचा मसुदा तयार केल्याचे सुतोवाच केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराणचे धक्कादायक पाऊल, इराणी संसदेत येणार प्रस्ताव
Donald Trump
| Updated on: May 16, 2026 | 4:27 PM

इराणच्या प्रसारमाध्यमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात एक बातमी आली असून त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. या बातमीत असा दावा केला जात आहे की इराणी सरकार ट्रम्प यांच्या हत्येच्या बदल्यात ५० मिलियन युरोच्या ( सुमारे ५५८ कोटी ) इनामाचा एक प्रस्ताव संसदेत आणण्याची तयारी करत आहे. इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र निती समितीचे चेअरमन इब्राहिम अजिजी यांनी इस्लामिक रिपब्लिक सैन्य आणि सुरक्षा एजन्सीद्वारा ‘काऊंटर एक्शन’नावाच्या योजनेचा मसुदा तयार करण्याची घोषणा केल्याचे वृत्त आहे.या मसुद्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी सुमारे ५५८ कोटींचे इनाम देण्याचा प्रस्ताव सामील आहे.

‘नेतान्याहू आणि सेंटकॉमचे कमांडर देखील टार्गेट’

इब्राहिम अजिजी यांनी सांगितले की ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि युएस सेंट्रल कमांडचे ( सेंटकॉम ) कमांडरना काऊंटर एक्शनसाठी टार्गेट करायला हवे. इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या हत्येत त्यांची भूमिका असल्याने त्यांना टार्गेट करण्याचे अजिजी यांनी म्हटले आहे. सरकारचे पाठीराखे अली अकबर राएफीपुरच्या मीडिया आऊटलेट ‘मसाफ’ने आधी दावा केला होता की ‘किल ट्रम्प’ नावाच्या कँपेनसाठी ५० मिलियन डॉलरचे ( सुमारे ५०० कोटी ) वित्तीय रिसोर्स सुरक्षित करण्यात आले आहेत.

हॅकींग ग्रुप ‘हंडाला’ ने ट्रम्प -नेतान्याहू यांच्या हत्येसाठी पैसे दिले

हॅकींग ग्रुप ‘हंडाला’ ने एक वक्तव्य जारी करत दावा केला होता की ग्रुपने ट्रम्प आणि नेतान्याहू यांना संपवण्यासाठी ५० मिलियन डॉलर ( सुमारे ५०० ) दिल्याचे इराण वायरने म्हटले आहे. हॅकींग ग्रुपच्या वक्तव्यात दावा केला होता की ही रक्कम कोणा अशा व्यक्ती वा ग्रुपला दिली जावी जो कारवाई करेल. त्यांचे कम्युनिकेशन आणि फायनाशियल चॅनल एन्क्रिप्शन आणि एनोनिमायजेशन टेक्नॉलॉजीने सुरक्षित आहेत.

हा आमचा अधिकार आहे – इब्राहिम अजीजी

इराण इंटरनॅशनल मीडियानुसार अजीजी यांनी सरकारी टीव्हीला सांगितले की मार्चमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर संसद सदस्यांनी अनेक बिल तयार केले आहेत. ज्यातील एक सैन्य आणि सुरक्षा बलाद्वारा जबावी कारवाईवर आहे. अजीजी यांनी सांगितले की आमचे म्हणणे आहे की अमेरिकेचे अध्यक्ष, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू आणि सेंटकॉम कमांडरना टार्गेट करायला हवे आणि त्यांच्या कारवाई करायला हवी. ते म्हणाले की हा आमचा अधिकार आहे. जसे आमचे इमाम शहीद झाले, तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत कोणत्याही मुस्लीम वा स्वतंत्र माणसाने वागले पाहिजे.’

मार्च महिन्यात इराणच्या मोबाईल युजर्सना मॅसेज पाठवला होता

प्रस्तावित विधेयकात हे निश्चित केले होते की कोणताही व्यक्ती वा संघटना या मिशनला पूर्ण करेल तर सरकारच्या वतीने त्यांना बक्षिस म्हणून ५५८ कोटी देणे बाध्य असेल. मार्चा सुरुवातील इराणमध्ये मोबाईल युजर्सना पाठवलेल्या टेस्क्ट मॅसेजमध्ये ‘ट्रम्प यांच्या हत्येसाठी इनाम’ शी संबंधित एका आंतरराष्ट्रीय मोहिमेचा प्रचार केला होता. इराण इंटरनॅशनलला दिलेल्या स्क्रीनशॉट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे.

 

 

Follow Us