युद्ध पेटलं! रशियाचा युक्रेनच्या दोन शहरांवर हल्ला, अनेकांचा मृत्यू
रशियाच्या अलिकडील हल्ल्यांनी युक्रेन पूर्णपणे हादरुन गेले आहे. मंगळवारी पहाटे रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या दोन शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाची तीव्रता वाढत आहे. रशिया सतत युक्रेनवर हल्ले करत आहे. रशियाच्या अलिकडील हल्ल्यांनी युक्रेन पूर्णपणे हादरुन गेले आहे. मंगळवारी पहाटे रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या दोन शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाच्या या हल्ल्यांमध्ये २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच १३ जण जखमी झाले.याबाबत महत्वाची माहिती जाणून घेऊयात.
वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली माहिती
रशियाने केलेल्या या हल्ल्याबाबत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी माहिती दिली आहे. त्यांनी हा हल्ला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे असं म्हटलं आहे. झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाने रात्री ३१५ ड्रोन आणि सात क्षेपणास्त्रे डागली. यातील बहुतेक ड्रोन ‘शाहेद ड्रोन’ होते.’ या हल्ल्यानंतर आता झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि युरोपकने रशियावर ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे.
इमारतींचे नुकसान
रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील काही इमारतींचे नुकसान झाले आहे. ओडेसा प्रांताचे प्रमुख ओलेह किपर म्हणाले की, ही हल्ल्यात दक्षिण बंदर शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रसूती रुग्णालयाचे आणि निवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.’ तसेच एका सरकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यामुळे शहरातील २ जण ठार झाले आणि ९ जण जखमी झाले. तसेच कवीमध्येही ४ जण जखमी झाले आहेत अशी माहिती कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी दिली आहे. .
आतापर्यंत १२ हजार नागरिकांचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, रशियाचे हवाई हल्ले रात्री सुरू होतात आणि सकाळी संपतात, कारण अंधारात ड्रोन ओळखणे आणि पाडणे कठीण असते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या युद्धादरम्यान रशियाने ड्रोनच्या मदतीने युक्रेनच्या नागरी भागांवर वारंवार हल्ला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते, या युद्धात आतापर्यंत १२,००० हून अधिक युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
युद्ध आणखी पेटण्याची शक्यता
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता आणखी पेटण्याची शक्यता आहे. या मुळे दोन्ही देशांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी काळात आता हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. रशियाची लष्करी क्षमता वाढलेली आहे, मात्र युक्रेनची सेना मर्यादित आहे. यामुळे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला अधिक मदतीसाठी आवाहन केले आहे.