AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणखी एक बॉम्बस्फोट, न्यूक्लिअर डिफेन्स चीफ ठार, राष्ट्रपती भवनही हादरलं; कोणत्या देशात घडली ही घटना?

मॉस्कोमध्ये झालेल्या भीषण स्फोटात रशियाच्या अणु कार्यक्रमाचे प्रमुख इगोर किरिलोव यांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनच्या सेक्युरिटी सर्व्हिसने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. किरिलोव हे राष्ट्रपती पुतिन यांच्या जवळचे होते आणि त्यांच्यावर युद्धगुन्हे करण्याचा आरोप होता. स्फोटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि तपास सुरू आहे.

आणखी एक बॉम्बस्फोट, न्यूक्लिअर डिफेन्स चीफ ठार, राष्ट्रपती भवनही हादरलं; कोणत्या देशात घडली ही घटना?
Russian general Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 17, 2024 | 4:05 PM
Share

रशियामध्ये आज आणखी एक भयंकर ब्लास्ट झाला आहे. या स्फोटात रशियाच्या न्यूक्लिअर प्रोग्रामचा प्रमुख इगोर किरिलोव ठार झाले आहेत. मॉस्को शहरात हा स्फोट झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. इगोर किरिलोव हे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे अत्यंत जवळचे होते. रशियाच्या राष्ट्रपती भवनापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाला. त्यामुळे राष्ट्रपती भवनही हादरून गेलं आहे. आम्हीच हा हल्ला घडवून आणला आहे, असा दावा यूक्रेनच्या सेक्युरिटी सर्व्हिसने केला आहे.

रिपोर्टनुसार, इगोर किरिलोव हे त्यांच्या अपार्टमेंटमधून बाहेर पडत होते. तेव्हाच पार्कात पार्क करण्यात आलेल्या एका स्कूटरमध्ये मोठा ब्लास्ट झाला. या ब्लास्टमध्ये इगोर किरिलोव यांच्यासोबतच त्यांच्या असिस्टंटचाही मृत्यू झाला आहे. हा स्फोट राष्ट्रपती भवनापासून अवघ्या सात किलोमीटरच्या अंतरावर झाला आहे. हा स्फोट घडवून आणण्यासाठी 300 ग्रॅम टीएनटीचा वापर करण्यात आल्याचं सांगितलं जातं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. इगोर यांच्या घराचा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज खंगाळण्यात येत आहेत.

तपास सुरू

ही स्कूटर येण्यापूर्वी आणि नंतरची परिस्थिती जाणून घेतली जात आहे. स्कूटर पार्क करणारे कोण होते? की कुणी ब्लास्टचं साहित्य या परिसरात आणून ठेवलं याची तपासणी केली जात आहे. याच वर्षी ऑक्टोबरमध्ये ब्रिटनने इगोर यांच्यावर बंदी घातली होती. त्यांच्यावर यूक्रेनमध्ये रासायनिश शस्त्रास्त्राची निगराणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

व्हिडीओ व्हायरल

या स्फोटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातून स्फोटाची दाहकता दिसून येते. स्फोट झाल्यानंतर इमारतीच्या बाहेर ढिगारा दिसत आहे. बाजूला रक्ताचे सडे पडले आहेत. तिथेच दोन मृतदेह पडलेले दिसत आहेत. पोलिसांनी या संपूर्ण परिसराची घेराबंदी केली आहे. संशयितांची कसून चौकशी केली जात आहे.

इमारतीचा भाग डॅमेज

हा स्फोट एवढा भीषण होता की इमारतीचा काही भाग डॅमेज झाला आहे. इगोर यांच्या मृत्यूनंतर रशियाच्या संसदेच्या उपाध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा सूनियोजित कट होता. आम्ही त्यांच्या हत्येचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

दरम्यान, इगोर हे एक युद्ध गुन्हेगार होते. त्यांच्यावर यूक्रेनला टार्गेट केल्याचा आरोप होता. त्यांनी यूक्रेनच्या सैन्यावर बंदी घातलेले केमिकल्स वापरण्याचे आदेश दिले होते. त्यांच्यामुळे यूक्रेनमध्ये मोठी जिवीत हानी झाली होती. अखेर त्यांचाही मृत्यू झाला आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.