AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीननंतर भारताच्या या शेजाऱ्याला मिळाले अत्याधुनिक सुखोई su-30 लढावू विमान, रशियाने दिला दुजोरा

सुखोई SU-30 हे मध्यम पल्ल्याचे लढाऊ विमान रशियाच्या सुखोई एव्हीएशन कॉर्पोरेशनने तयार केले असून ते आशियातील अनेक देशांच्या वायू सेनेत महत्वाची भूमिका बजावत आहे.

चीननंतर भारताच्या या शेजाऱ्याला मिळाले अत्याधुनिक सुखोई su-30 लढावू विमान, रशियाने दिला दुजोरा
Sukhoi_Su 30 Image Credit source: socialmedia
| Updated on: Sep 11, 2023 | 2:06 PM
Share

मॉस्को | 11 सप्टेंबर 2023 : एकीकडे रशियाचे युक्रेनशी युद्ध सुरु असताना रशिया अन्य देशांशी आपले सैनिक आणि व्यापारी संबंध वाढवित आहे. यात रशियाने अनेक देशांनी केलेल्या सैन्य सहकार्य कराराचा समावेश आहे. आता रशियाने अलिकडेच कबुली दिली आहे की त्यांनी आशियातील आणखी एका देशाला सुखोई एसयू-30 लढावू विमानांचा पहिला तुकडी दिली आहे. या अत्याधुनिक विमानांच्या वेगवेगळ्या मालिकेतील विमाने याआधीच चीन आणि भारतीय वायू सेनेत सामील आहेत. भारताची हिंदूस्थान एअरोनॉटिकल्स लिमिटेड तंत्रज्ञान हस्तांतर करारांतर्गत देशातच सुखोईची बांधणी करीत आहे.

रशियाच्या सरकारी न्यूज एजन्सी आरआयएने म्हटले आहे की म्यानमारला दोन रशियन सुखोई su-30 लडाऊ विमानांची पहिली तुकडी मिळाली आहे. म्यानमारचे व्यापार मंत्री चार्ली थान यांनी रशियाकडून सुखोई विमाने मिळाल्याचे मान्य केले आहे. रशियात आयोजित ईस्टर्न इकॉनामिक फोरमच्या निमित्ताने म्यानमारचे व्यापार मंत्री थान यांनी आरआयए या वृत्तसंस्थेला सांगितले की पहिल्या टप्प्यात रशियाकडून दोन सुखोई विमाने मिळाली आहेत. परदेशी गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहकार्यासाठी रशिया दरवर्षी ईर्स्टन इकॉनामिक फोरम आयोजित करीत असते. रविवारपासून व्लादिवोस्तोक बंदरात हा कार्यक्रम सुरु झाला आहे.

सहा महिन्यांपूर्वी झाला करार

आरआयए या वृत्तसंस्थेने म्हटले की रशिया आणि म्यानमार सहा महिन्यांपूर्वी सहा su-30SME लढावू विमानांच्या डीलिव्हरीसाठी सप्टेंबर 2022 मध्ये एका करारावर सह्या केल्या होत्या. रशियाच्या सरकारी शस्रे निर्यातक रोसोबोरोनेक्सपोर्टच्या मते सुखोई su-30SME हे मल्टी रोल फायटर जेट शत्रूच्या हवाई लक्ष्यांवर हल्ला करणे, हवाई टोही मिशन राबविणे, लढावू पेट्रोलिंग आणि पायलटना प्रशिक्षण देण्यासाठी खास डीझाईन केले आहे.

अमेरिकेने दिला इशारा

म्यानमारचे व्यापार मंत्री थान आणखी एक रशियन वृत्त एजन्सी TASS ला सांगितले की इस्ट इकोनॉमिक फोरममध्ये दोन्ही देशातील पर्यटन विकासासह अनेक द्वीपक्षीय सामंजस्य करारावर सह्या केल्या जाणार आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयाने यावर तातडीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. रशियाने म्यानमारला शस्रे दिल्याने अमेरिकेने या करारावर नाराजी व्यक्त करीत इशारा दिला आहे. हत्यारांच्या पुरवठ्याने संघर्षाला प्रोत्साहन मिळत असून त्या देशासाठी ते संकट होऊ शकते. रशियाला म्यानमारने दिलेले सर्मथन तेथील सरकारला अस्थिर करु शकते असे म्हटले आहे.

या देशातही सुखोई पुरवठा

रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी अनेकदा म्यानमारचे दौरे केले आहेत. रशियाने म्यानमारमध्ये अनेकदा विमाने उतरविली आहेत. रशियाने म्यानमारला अनेक छोटी-मोठी शस्रास्रे पुरविली आहे. याशिवाय सुखोई Su -30 लढावू विमानांचा समावेश आतापर्यंत भारत आणि चीनशिवाय मलेशिया, व्हेनेझुएला, अल्जीरिया, युगांडा, इंडोनेशिया, अंगोला, व्हिएतनाम, कझाकिस्तान, आर्मेनिया आणि बेलारुस आदींच्या वायूसेनेत झाला आहे.

Follow Us
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...