तो व्यक्ती कायदेशीर त्या पदावर आहे का… रशियाचा मोठा दणका, जगाचे टेन्शन वाढले
भारत आणि अमेरिकेत टॅरिफवरून तणाव वाढलेला असतानाच आता मोठ्या घडामोडींना वेग आल्याचे बघायला मिळत आहे. आता बैठकीपूर्वीच रशियाने थेट मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. टॅरिफच्या वादात भारताच्या खंबीरपणे मागे रशिया उभा आहे.

रशिया युक्रेनमधील वाद टोकाला पोहोचलेला असतानाच आता रशियाने मोठा प्रश्न उपस्थित केलाय. दुसरीकडे अमेरिका रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला भारतच जबाबदार असल्याचे सांगताना दिसत आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने हे युद्ध ताणले जात असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. मात्र, चीन हा रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणारा देश आहे. आता नुकताच रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी म्हटले की, आमची इच्छा आहे की, या युद्धाबाबत समोरासमोर चर्चा व्हावी.
पण कोणत्याही चर्चेसाठी हे स्पष्ट व्हावे की, आम्हाला नेमके कोणासोबत चर्चा करायची आहे. जेव्हा मार्ग काढण्यासाठी एकत्र बसले जाते. त्यावेळी शेवटी सही झाली पाहिजे. याबद्दल स्पष्ट माहिती असली पाहिजे की, जो व्यक्ती या महत्वाच्या करारावर सह्या करत आहे, तो व्यक्ती कायदेशीर त्या पदावर आहे का? कारण युक्रेनच्या संविधानाप्रमाणे जेलेंस्की हे राष्ट्रपती नाहीत. लावरोव यांनी म्हटले की, आम्ही स्वीकार करतो की, जेलेंस्की हे युक्रेनच्या शासनाचे प्रमुख आहेत.
पण युक्रेनकडून समझोता करारावर सह्या करणार कोण? जेलेंस्की हे पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, यामागे त्यांचे अत्यंत मोठं षडयंत्र आहे. त्यांना या बैठकीतून त्यांची वैधता मंजूर करून घ्यायची आहे. मुळात म्हणजे त्यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपला आहे, त्यामुळे युद्धाबाबतच्या करारावर सह्या करण्यासाठी युक्रेनची कायद्यानुसार योग्य व्यक्ती जेलेस्की नसल्याचे रशियाकडून सांगण्यात आले आहे.
पुतिन आणि जेलेंस्की यांच्यात बैठक घडवून देण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतल्याचे बघायला मिळतंय. पुतिन हे अगोदर अमेरिकेच्या दाैऱ्यावर होते, यावेळी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मग जेलेंस्की हे देखील अमेरिकेच्या दाैऱ्यावर गेले. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन आणि जेलेंस्की या दोघांना समोरासमोर बसून चर्चा करण्यास सांगितले आहे. मात्र, आता रशियाकडून थेट मोठा प्रश्न उपस्थित केल्याचे बघायला मिळतंय. आता युक्रेन आणि रशियामध्ये चर्चा होणार की, नाही याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत.
