आता नवं युद्ध पेटलं! 477 ड्रोन, 67 मिसाईल्स, रशियाचा युक्रेनवर सर्वांत मोठा एअर स्ट्राईक, जगाला धसका
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव वाढतच चालला आहे. रशियाने आता युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला आहे.

Russia Ukraine War Update : इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा धसका संपूर्ण जगाने घेतला होता. हे दोन्ही देश एकमेकांवर बॉम्बगोळ्यांचा वर्षाव करत होते. आता मात्र अमेरिकेच्या मध्यस्थीने हे युद्ध थांबले आहे. असे असतानाच जग पुन्हा एकदा चिंतेच्या खाईत लोटले गेले आहे. कारण रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध पुन्हा एकदा पेटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा एअर स्ट्राईक (हवाई हल्ला) केला आहे. या हल्ल्यात युक्रेनमधील शेकडो लोक मारले गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
नेमकी अपडेट काय? रशियाने काय केलं?
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात रशियान युक्रेनवर ब्बल 477 ड्रोन आणि तब्बल 67 मिसाईल्स डागल्या आहेत. एका रात्रीत रशियाने युक्रेनवर हा हल्ला चढवला आहे. या हल्ल्यानंतर आता रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव चांगलाच वाढला आहे.
आधी म्हणाले शांतता चर्चेसाठी तयार, आता लगेच…
या हल्ल्यानंतर युक्रेनने प्रतिक्रिया दिली आहे. रशियाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला होता, असं युक्रेनने सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही देशांत लवकरच शस्त्रसंधीच्या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. विशेष म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनीही आम्ही शांतता चर्चेसाठी नव्याने चर्चा करायला तयार आहोत, असे म्हटले होते. असे असतानाच आता रशियाने युक्रेनवर हा संहारक हवाई हल्ला केला आहे.
युक्रेनचे फायटर जेट पाडले
रशियाच्या या हल्ल्याला परतवून लावण्यासाठी युक्रेनने यावेळी प्रयत्ने केला. युक्रेनला पाश्चिमात्त्य मित्रराष्ट्रांकडून मिळालेल्या एफ-16 विमानालाही यावेळी रशियाने पाडले. यात युक्रेनच्या पायलटचा मृत्यू झाला.
पोलंड देशाने विमानं तैनात केली
दरम्यान, रशियाने या हल्यात पश्चिम युक्रेनसह युक्रेनमधील इतर प्रदेशालाही लक्ष्य केले आहे. तर दुसरीकडे आपल्या हवाई क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी पोलंड तसेच इतर राष्ट्रांनी आपापली लढाऊ विमाने तयार ठेवली आहेत. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
