रशियाचा युक्रेनवर पुन्हा तुफान हल्ला, ड्रोन अन् क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडताच झेलेन्स्कीकडून शांततेसाठी साकडे?
रशिया आणि युक्रेन युद्ध घातक वळणावर येत आहे. शनिवारी पुन्हा रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर झेलेंस्की यांनी जगाला शांततेचे आवाहन केले आहे.

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरु असलेले युद्ध तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहचण्याची शक्यता आहे. युक्रेनने रशियावर केलेल्या हल्ल्याचा बदला व्लादीमीर पुतिन यांनी शुक्रवारी घेतला. त्यानंतर शनिवारीसुद्धा युक्रेनवर तुफान हल्ले रशियाने केले. यामध्ये ४०० पेक्षा जास्त ड्रोनने हल्ले करण्यात आले. त्यामुळे युक्रेनच्या अवकाशात अनेक स्फोट होताना दिसत होते. तसेच क्षेपणास्त्रानेसुद्धा हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून ८० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहे.
यामुळे केले हल्ले
रशियाच्या चार एअरबेसवर युक्रेनने हल्ला करत ४१ लढाऊ विमाने नष्ट केली होती. त्याचवेळी पुतिन यांनी युक्रेनवर जोरदार हल्ल्याचा निर्णय घेतला होता. युक्रेनच्या या हल्ल्यात युरोपचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेन युद्ध तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शांतता आणि सुरक्षेची गरज
युक्रेनची राजधानी क्यीववर रशियाने शनिवारी जोरदार हल्ले केले. त्याबाबर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमिर झेलेंस्की यांनी म्हटले की, युक्रेनवर ४०० पेक्षा जास्त ड्रोन हल्ले झाले. शहरात सातत्याने सायरन वाजत आहे. यामध्ये ८० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहे. कोणीही या हल्ल्याचा निषेध केला नाही, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. त्याचा फायदा पुतिन घेत असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले.
झेलेंस्की यांनी पुढे म्हटले की, जगभरात एकता नाही. त्याचा फायदा पुतिन घेत आहे. त्यांच्यावर दबाव टाकण्याची गरज आहे. सुरक्षा आणि शांतता गरजेची आहे. शस्त्रसंधीची खूप गरज आहे. रशियाने हल्ले थांबवण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला गेला पाहिजे.
युक्रेनमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्वीवसह चेरनिहीव, लुट्स्क आणि टेर्नोपिल शहरावर क्रूज क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले झाले. रशियाने म्हटले की, युक्रेनच्या दहशतवादी कृत्याला उत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले. आमच्या लष्कराने जमीन, पाणी आणि हवेवरुन मार्मिक हल्ले केले.
