AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा सर्वांत मोठा विजय, पाकिस्तानला सर्वांत मोठा धक्का; जगातील महाशक्तीचा थेट मोदींना फोन, आता…

. कोणत्याही क्षणी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊ शकते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. असे असतानाच आता जगात महासत्ता असलेला रशिया हा देश भारताच्या बाजूने उभा राहिला आहे.

भारताचा सर्वांत मोठा विजय, पाकिस्तानला सर्वांत मोठा धक्का; जगातील महाशक्तीचा थेट मोदींना फोन, आता...
russia supports india
| Edited By: | Updated on: May 05, 2025 | 4:28 PM
Share

Russia Supports India : पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानची वेगवेगळ्या मार्गाने कोंडी करत आहे. जागतिक पातळीवरही पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. कोणत्याही क्षणी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊ शकते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. असे असतानाच आता जगात महासत्ता असलेला रशिया हा देश भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. रशियाच्या या पाठिंब्यामुळे भारताचं एकाप्रकारे बळ वाढणार आहे.

नेमकं काय घडलंय?

दहशतवादाविरूद्धच्या लढाईत महासत्ता असलेल्या रशियाने भारताला पाठिंबा दिला आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आमचा भारताला पूर्ण पाठिंबा असल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवरून संवाद झाला. या संवादात पुतीन यांनी आम्ही दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत असल्याचं म्हणत पुतीन यांनी भारताला आश्वस्त केलं आहे.

रशियाचा पुन्हा एकदा भारताला पाठिंबा

भारत आणि रशिया यांच्यात फर जुनी मैत्री आहे. अनेक प्रसंगात हे दोन्ही देश एकमेकांना मदत करण्यासाठी समोर आलेले आहेत. रशियाकडून भारताला मोठी शस्त्रं मिळतात. युद्धजन्य परिस्थितीत रशियाने भारताला नेहमीच साथ दिली आहे. आता रशियाने पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात लढाई देण्यासाठी भारताला पाठिंबा दिला आहे.

मृत पावलेल्यांप्रती व्यक्त केल्या संवेदना

विशेष म्हणजे व्लादीमीर पुतीन यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेधही केला आहे. या हल्ल्यात मृत पावलेल्यांप्रती पुतीन यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच हल्ल्याच्या दोषींना आणि त्यांच्या समर्थकांना न्यायाच्या कक्षेत आणलं पाहिजे, अशीही भूमिका पुतीन यांनी घेतलीय.

1971 साली दिला होता भारताला पाठिंबा

दरम्यान, 1971 सालच्या युद्धातही रशिया हा देश भारताच्या बाजूने उभा राहिला होता. आता पुन्हा एकदा रशिया भारताच्या बाजूने आल्यामुळे पाकिस्तानला हा मोठा हादरा समजला जातोय. पाकिस्ताननं रशियाला मदतीसाठी आवाहन केलं होतं. पण रशियानं पाकिस्ताचं आवाहन झिडकारत भारताला पाठिंबा दिलाय. युद्धजन्य परिस्थितीत रशियाचा भारताला पाठिंबा असणे हे एकाप्रकारे भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...