AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine War : युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचा पुतिन यांना चर्चेचा प्रस्ताव, आता तरी विध्वंस थांबणार?

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Ukraine President Volodymyr Zelensky) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना जेरुसलेममध्ये चर्चेचा प्रस्ताव दिला आहे.

Russia Ukraine War : युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचा पुतिन यांना चर्चेचा प्रस्ताव, आता तरी विध्वंस थांबणार?
पुन्हा चर्चेसाठी प्रस्तावImage Credit source: tv9
| Updated on: Mar 12, 2022 | 10:28 PM
Share

नवी दिल्ली : गेल्या दोन आठवड्यांपासून रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine War) विध्वंस सुरू आहे. अनेक बैठका होऊनही त्यातून मार्ग निघालेला नाही. आता पुन्हा दोन्ही देश चर्चेच्या टेबलावर येण्याची शक्यात आहे. कारण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Ukraine President Volodymyr Zelensky) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना जेरुसलेममध्ये चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. कीव इंडिपेंडंटने शनिवारी ही माहिती दिली आहे. झेलेन्स्की यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना मॉस्को आणि कीव यांच्यात मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. अशीही माहिती त्यांनी दिली आहे. याआधी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाच्या पहिल्या हल्ल्यापासून युद्धात 1300 युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी मेलिटोपोलच्या महापौरांच्या सुटकेसाठी मदत करण्यासाठी फ्रान्स आणि जर्मनीच्या नेत्यांना बोलावले आहे. रशियन सैन्याने त्यांचे अपहरण केल्याचे कीवचे म्हणणे आहे. दरम्यान, युनायटेड नेशन्स युद्धग्रस्त युक्रेनला आवश्यक मदत पुरवण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉरबाबत दोन्ही बाजूंशी चर्चा करत आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

अमेरिकेकडून मदत जाहीर

दरम्यान यूएस काँग्रेसने युद्धग्रस्त युक्रेन आणि त्याच्या युरोपियन मित्र राष्ट्रांना 13.6 अब्ज डॉलरची लष्करी आणि आपत्कालीन मदत मंजूर केली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर वीस लाखांहून अधिक लोकांना देश सोडून पलायन करावे लागले आहे. सिनेटने गुरुवारी उशिरा एकूण 1.5 ट्रिलियन यूएस डॉलर्सच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. प्रस्तावाच्या बाजूने 68 तर विरोधात 31 मते पडली.

रशियाने खोटी माहिती पसरवली

त्याच वेळी युक्रेनमध्ये रासायनिक किंवा जैविक शस्त्रांच्या संभाव्य वापराबद्दल सांगण्यात आले आहे. चुकीची माहिती पसरविण्यासाठी यूएन सुरक्षा परिषदेच्या बैठकीचा वापर केल्याचा आरोप अमेरिकेने रशियावर केला. राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी शुक्रवारी सांगितले की रशिया अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी गेल्या महिन्यात कौन्सिलमध्ये मांडलेली परिस्थिती नाकारत आहे, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनविरुद्धच्या हिंसक हल्ल्यांचे समर्थन करण्यासाठी रासायनिक किंवा जैविक शस्त्रे वापरतील, असेही सांगण्यात आले आहे. आता या चर्चेतून तरी दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित होईल अशी अशा सर्वांना लागली आहे.

Russia Ukraine War : रशियाचे ISIS सारखे धंदे, महापौरांना किडनॅप केल्याचा झेलेन्स्कींचा आरोप

Video | युक्रेनकडून रशियन सैनिकांच्या वाहन ताफ्यावर हल्ला; अनेक वाहने उद्ध्वस्त; आग, धुूराचे लोट

Video : बिल्ली नही, इसबार तो बिल्ला निकल आया, पाकिस्तानवर फायर झालेल्या भारतीय मिसाईलनं पाकमध्ये खळबळ

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.