पुतीन भडकले, युक्रेन बेचिराख होणार? लवकरच…युद्धाचा मोठा भडका उडण्याची शक्यता!
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने भीषण रुप धारण केले आहे. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर रशिया आता चोख प्रत्युत्तर देणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्ष वाढला आहे. या दोन्ही देशांतील युद्धाने सध्या भीषण रुप धारण केलं आहे. युक्रेनने शोकडे ड्रोनच्या माध्यमातून रसियामध्ये घुसून हल्ले केले आहेत. विशेष म्हणजे या हल्ल्यात रशियाची एकूण 41 विमानं ध्वस्त झाली आहेत. असे असतानाच आता युक्रेनच्या या हल्ल्याला रशियादेखील सडेतोड उत्तर देणार आहे. खुद्द रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीच तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
पुतीन-ट्रम्प यांच्यात फोनद्वारे चर्चा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांनी नेमकं काय म्हटलंय याबाबत सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात एका तासापेक्षा अधिक काळ फोनद्वारे चर्चा झाली. या चर्चेनंतर रशिया युक्रेनला जशास तसे उत्तर देणार आहे, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
रशिया युक्रेनला चोख प्रत्युत्तर देणार
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया मंचावर याबाबत माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात युक्रेनसोबतच्या युद्धावर चर्चा झाली. आमच्या दोघांत चांगली चर्चा झाली. मात्र आमच्या या चर्चेतून शांततेचा तोडगा लगेच निघणार नाही. युक्रेनने केलेल्या हल्ल्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देणार, असे पुतीन यांनी ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितले आहे.
अमेरिकेची भूमिका काय?
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावे यासाठी अमेरिकेकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यात सक्रियपणे सहभाग घेत आहेत. पुतीन यांनी युद्धबंधीवर गंभीरपणे विचार केला पाहिजे, असं याआधीही अमेरिकेने म्हटलेले आहे. मात्र पुतीन यांनी आम्ही युक्रेनला प्रत्युत्तर देणार, असं स्पष्टपणे सांगितलंय.
2022 सालापासून चालू आहे युद्ध
दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यात 24 फेब्रुवारी 2022 रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. तेव्हापासून दोन्ही देशांनी एकमेकांवर जोरदार हल्ले केलेले आहेत. यात दोन्ही बाजूचे हजारो सैनिक मृत्युमुखी पडलेले आहेत. आता युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर रशिया नेमकं काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
