फोन दिला नाही तर बंदूक निघेल.. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेत धक्कादायक प्रकार, थेट..

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव भारत दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. ज्याने एकच खळबळ उडाली. सर्गेई लावरोव यांच्या पत्रकार परिषदेमध्ये असे काही घडले की, ज्याची तूफान चर्चा रंगत आहे. थेट सर्गेई लावरोव यांनी बंदूक काढण्याची धमकी दिली.

फोन दिला नाही तर बंदूक निघेल.. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेत धक्कादायक प्रकार, थेट..
Russian Foreign Minister Sergey Lavrov
| Updated on: May 17, 2026 | 9:03 AM

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव भारत दाैऱ्यावर आहेत. मात्र, यादरम्यान दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये एक धक्कादायक घटना घडली, ज्यानंतर सर्गेई लावरोव भडकल्याचे बघायला मिळाले. सर्गेई लावरोव यांची पत्रकार परिषद सुरू असताना एका पत्रकाराचा फोन वाजला. त्यानंतर त्याने थेट फोन उचलून बोलण्यासही सुरूवात केली. पत्रकार परिषद सुरू असताना त्या पत्रकाराने फोन उचलला आणि तो हळू आवाजात बोलत होता. मात्र, त्याचा आवाज हॉलमध्ये येत होता. यादरम्यान सर्गेई लावरोव यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी आपली पत्रकार परिषदमध्येच थांबवली. याबाबतचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. पत्रकार परिषदेच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, इंग्रजीमध्ये सर्गेई लावरोव म्हणतात की, तुम्ही आम्हाला पत्रकार परिषद पुढे घेऊन जाऊ देणार आहात का? मी काही मजाक करत नाहीये. सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे पाहत त्यांनी म्हटले की, याला इथून बाहेर काढा.

यादरम्यानच पुढे सर्गेई लावरोव यांनी थेट म्हटले की, जर याने फोन दिला नाही तर सुरक्षारक्षक आता बंदूक काढतील. सर्गेई लावरोव यांच्या या विधानानंतर उपस्थित लोक हसताना दिसले. मात्र, सर्गेई लावरोव चांगलेच रागात दिसत होते. व्हायरल व्हिडीओनंतर लोकांनी म्हटले की, सर्गेई लावरोव हे मजाकमध्ये बोलत नसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहे.

सर्गेई लावरोव भारत दाैऱ्यावर असून त्यांनी या दाैऱ्याची माहिती देण्याकरिता पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेमध्ये हा प्रकार घडला. गेल्या अनेक वर्षापासून भारत आणि रशियाचे संबंध अत्यंत चांगले आहेत. भारतावर अमेरिकेने 200 टक्के टॅरिफ लावल्यानंतर भारताच्या मागे रशिया खंबीरपणे उभा होता. भारतासोबत मोठे करार रशियाने केले.

रशियाचे अध्यक्ष पुतिन भारत दाैऱ्यावर आपल्या सात मंत्र्यांना घेऊन आले. या दाैऱ्यामध्ये त्यांनी मोठे करार केले. इराण आणि अमेरिका युद्धात भारताला हवे तेवढे तेल रशियाकडून दिले जात आहे. भारताच्या शेजारील देशांमध्ये कच्च्या तेलाची मोठी समस्या असताना भारतात परिस्थिती त्या तुलनेत व्यवस्थित आहे. सर्गेई लावरोव यांचा हा भारत दाैरा चांगलाच चर्चेत आला.

Follow Us