AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंगालमध्ये राजकारण पेटले… 125 व्या जयंतपूर्वीच वातावरण तापले, कोलकत्त्यात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मारकाची तोडफोड

West Bengal Politics: डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची 125 वी जयंती उद्या आहे. त्यापूर्वीच कोलकत्तामध्ये मोठा हंगामा झाला. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मारकाची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी CCTV फुटेज आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

बंगालमध्ये राजकारण पेटले... 125 व्या जयंतपूर्वीच वातावरण तापले, कोलकत्त्यात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मारकाची तोडफोड
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मारकाची तोडफोड
| Updated on: Jul 05, 2026 | 2:30 PM
Share

Dr Syama Prasad Mookerjee 125th birth anniversary: भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची उद्या 6 जुलै रोजी 125 वी जयंती आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपा सत्तेत आली आहे. डॉ. मुखर्जी यांची जयंती जल्लोषात साजरी होणार आहे. त्यापूर्वीच कोलकत्त्यात मोठा गोंधळ उडाला. सुक्रिया स्ट्रीट भागातील श्यामा प्रसाद मुखर्जी आणि गोपाल पाठा (मुखर्जी) यांच्या स्मारकाची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने पश्चिम बंगालचे राजकारण पेटले आहे. ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये विस्तवही जात नाही. त्यात अशा घटनांनी वातावरण तापले आहे.

मुखर्जी आणि पाठा स्मारक तोडण्याचा प्रयत्न

श्यामा प्रसाद मुखर्जी आणि गोपाल पाठा यांचे स्मारक नुकतेच तयार करण्यात आले होते. एका चौथऱ्यावर अर्धपुतळे बसवण्यात आले होते. त्याचे उद्धघाटन उद्या होणार होते. त्यापूर्वीच चौथरा फोडण्याचा आणि मूर्ती हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मध्यरात्री दोन्ही स्मारकांचे चौथरे तोडण्यात आले. दोन्ही पुतळे सुरक्षित आहेत. त्यांच्यावर काळी शाई टाकण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. उद्या या स्मारकाचे उद्धघाटन होणार होते. त्यापूर्वीच ही घटना समोर आल्याने भाजप कार्यकर्ते संतापले आहेत. पोलिसांनी CCTV फुटेज आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांकडून आरोपींचा शोध

आज सकाळी ही घटना समोर आली. उद्याच्या कार्यक्रमानिमित्त पूर्व तयारीसाठी काही जण या परिसरात आले होते. त्यावेळी हा प्रकार उघड झाला. त्यानंतर लागलीच पोलिसांनी याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. त्यांनी परिसराची पाहणी केली. या परिसराची तातडीने स्वच्छता करण्यात आली आहे. तातडीने स्मारकाची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. या घटनेने कार्यकर्ते संतापले आहेत. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. तर खबऱ्यांकडेही विचारपूस करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीपासून बंगालचे राजकारण तापलेले आहे. त्यात या घटनेने आगीत तेल ओतण्याचे काम झाले आहे.

अमित शाह उद्या कोलकत्त्यात

पश्चिम बंगालमध्ये रविवारपासूनच डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची 125 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. अनेक राजकीय संघटना आणि संस्थांनी कार्यक्रमांचं आयोजन केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवारी राज्याच्या दौऱ्यावर असतील. जयंतीच्या कार्यक्रमात ते सहभागी होतील. त्याअगोदचर या घटनेने पोलिसांसमोर आव्हान उभं केलं आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ