AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाय राम! अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासा… गर्लफ्रेंडची एंट्री… आरोपीने कुठे उधळले पैसे?

Ayodhya Ram Mandir Donation Scam : अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील दानपेटीवर कर्मचारी आणि संबंधितांनी डल्ला मारला. कोट्यवधींचे दान पळवले. त्यात सोने आणि चांदीचाही समावेश आहे. यातील एका आरोपीकडून तर एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्व घटनेमुळे देशातील राम भक्तांमध्ये मोठा संताप उसळला आहे.

हाय राम! अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासा... गर्लफ्रेंडची एंट्री... आरोपीने कुठे उधळले पैसे?
राम मंदिर देणगी घोटाळा
| Updated on: Jul 05, 2026 | 12:38 PM
Share

Ayodhya Ram Mandir Donation Scam : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळ्याने देशात संतापाची लाट उसळली. राम भक्तांमध्ये असंतोष आहे. त्यातच या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहे. आरोपी अविनाश शुक्ला याने देणगी चोरीतील 15 लाख रुपयाहून अधिकची हेराफेरी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. राम मंदिरातील तिजोरीवर दरोडा घालत आरोपी अविनाश शुक्लाने त्याच प्रेयसीवर ही रक्कम उधळल्याचे समोर आले आहे.

गर्लफ्रेंडला महागडा मोबाईल

अविनाश शुक्ला हा राम मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणातील आरोपी आहे. त्याने 15 लाखांहून अधिक रक्कमेची हेराफेरी केल्याचा संशय आहे. अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता त्यातून धक्कादायक बाबी समोर आल्या. आरोपीने चोरीच्या रक्कमेतून त्याच्या प्रेयसीला महागडा मोबाईल गिफ्ट दिल्याचे उघड झाले आहे. तर गर्लफ्रेंडला त्याने खर्चासाठी दोन लाख रुपये नकदी दिल्याचेही समोर आले आहे. तर त्याने अजून इतर ठिकाणीही पैसा उधळल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्याने हा पैसा कसा आणि कुठून चोरला याचा पोलीस तपास करत आहेत.

भावाने विचारताच वळली बोबडी

अविनाशचा भाऊ अभिषेक शुक्ला याला त्याच्यावर संशय आला होता. राम मंदिरातील ड्युटी संपल्यानंतर तो भली मोठी रोख रक्कम घेऊन योग केंद्रात जात असे. त्याविषयी विचारल्यावर अविनाश व्यवस्थित उत्तर देत नव्हता. एकदा त्याने सांगितले की भाविक भक्त आनंदाने त्याला ही रक्कम देतात. कारण तो त्यांना दर्शनासाठी मदत करतो. पण भावाला त्याचे हे उत्तर काही पटले नव्हते. त्याने याविषयी शंकाही व्यक्त केली होती. आता तपासादरम्यान त्याने अधिकाऱ्याला योग केंद्रावर ही रक्कम नेण्यात येत होती याची माहिती दिली आहे.  याप्रकरणात इतर धागेदोरे लागतात का, याचा पोलीस तपास करत आहेत.

एसआयटीकडून चौकशी

याप्रकरणी आठहून अधिक कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. काही संचालक एसआयटीच्या रडारवर आहेत. याप्रकरणी अनेक दिग्गज आता बोलताना अडखळत आहेत. ज्यांनी राम मंदिर बांधल्यानंतर जल्लोष केला होता, ते लोक या प्रकरणावर काहीच बोलत नसल्याने राम भक्त संतापले आहेत. दरम्यान पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. घर, दुकान, नातेवाईक, बँका आणि इतर ठिकाणी तपास सुरू आहे. आरोपीं आणि इतरांची चौकशी करण्यात येत आहे.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा