एका झटक्यात 12 सैनिकांना बनवलं करोडपती? बाराच का? रशियाने का केलं असं?
युक्रेनमधील युद्धात अमेरिकेच्या एफ-16 लढाऊ विमानाला पाडणाऱ्या 12 रशियन सैनिकांना रशियातील एका मोठ्या तेल कंपनीने 1.6 लाख डॉलर्सचे बक्षीस दिले आहे. ही कंपनी रशियाला युद्धात मदत करत आहे आणि पाश्चात्य शस्त्रास्त्रे नष्ट करणाऱ्या सैनिकांना मोठ्या प्रमाणात बक्षीस देण्याची ती रणनीतीचा भाग आहे.

यूक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाने आपल्या सैनिकांना करोडपती बनवलं आहे. आमच्या सैनिकांनी अमेरिकेच्या एफ-16 फायटर जेटला पाडलं आहे, असा रशियाने दावा केला आहे. महाशक्ती अमेरिकेचं फायटर जेट पाडल्यामुळेच रशियाने त्यांच्या 12 रशियन सैनिकांना करोडपती बनवलं आहे. रशियन सैनिकांना बक्षीस देणारी ही सरकारी एजन्सी नाही तर एक मोठी तेल कंपनी आहे. रशियाला युद्धात ही कंपनी उघडपणे समर्थन देत होती.
रशियन ऑईल कंपनी Foresने अमेरिकेचं फायटर जेट पाडणाऱ्या 12 सैनिकांना एकूण 1.5 कोटी रुबल (सुमारे 1.6 लाख डॉलर म्हणजे सुमारे 13.5 कोटी रुपये) बक्षीस म्हणून दिले आहेत. या 12 सैनिकांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती. अमेरिका सारख्या महासत्तेच्या फायटर जेटला पाडण्याचं असाधारण काम केलं होतं. म्हणून त्यांना ही घसघशीत रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. 29 मे रोजी एक खास कार्यक्रम घेऊन हे बक्षीस देण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला रशियन सैन्यातील बडे अधिकारी उपस्थित होते. जो सर्वात आधी एफ-16 पाडेल त्याला मोठं बक्षीस दिलं जाईल, अशी घोषणा आम्ही केली होती. आता आम्ही आमचं वचन पूर्ण केलं आहे, असं Fores कंपनीने म्हटलं आहे.
लांब पल्ल्याचे मिसाइल पाडले
रिपोर्टनुसार, एप्रिल 2025मध्ये एफ-16 जेटला रशियाने 40N6 ही लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र होती, तिने अमेरिकेच्या फायटर जेटला पाडलं. हा हल्ला यूक्रेनच्या ताब्यातील भागात झाला. दरम्यान, सैनिकांना बक्षीस याचा कारणास्तव दिलं की इतर कोणत्या हे अद्याप रशियाने सांगितलं नाही. आतापर्यत तीन एफ-16 क्रॅश झाल्याची बातमी समोर आलेली आहे. त्यातील एकावर शत्रूंच्या हल्ल्याची पुष्टी करण्यात आली आहे. इतर दोनची चौकशी सुरू आहे.
पाश्चात्य हत्यारे निशाण्यावर…
Fores कंपनीने यापूर्वीही NATO कडून मिळालेले टँक उडवणाऱ्या सैनिकांना बक्षीस दिलेलं आहे. हा रशियाच्या रणनीतीचा भाग आहे. त्यानुसार, पाश्चात्य शस्त्रांना निशाणा बनवणाऱ्या सैनिकांना बक्षीस म्हणून घसघशीत रक्कम दिली जात आहे. Fores कंपनी केवळ बक्षीस देत नाही तर रशियाच्या युद्धाला आर्थिक आणि लॉजिस्टिक मदतही करते. आतापर्यंत या कंपनीने रशियाला 30 लाख डॉलरचं सामान खरेदी करून दिलं आहे. यात ड्रोन जॅमर, थर्मल साइट, औषधे आणि मेडिकल उपकरणांचा समावेश आहे.
अमेरिकेतून मागणी, यूरोपातून पुरवठा
यूक्रेन बऱ्याच काळापासून अमेरिकेकडून F-15 आणि F-16 सारख्या अत्याधुनिक फायटर जेटची मागणी करत होता. 2024च्या उन्हाळ्यात डेन्मार्क आणि नेदरलँड्सने 60 अमेरिकन एफ-16 देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर काही जेट यूक्रेनला पोहोचलेही होते. त्याशिवाय नॉर्वे, बेल्झियम आणि ग्रीसनेही असे आश्वासने दिली होती. रोमानियात असलेल्या यूरोपीय एफ-16 ट्रेनिंग सेंटरमध्ये पायलटांची ट्रेनिंग होत आहे. दरम्यान, या जेट्सचं मेंटेनन्स, स्पेअर पार्ट्स आणि ऑपरेशन आदी गोष्टींमुळे यूक्रेनला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
