अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारताचे झिरो नुकसान, व्लादिमीर पुतिन यांचे थेट मोठे आदेश, डोनाल्ड ट्रम्प यांची..
America Tariff : अमेरिकेने भारतावर अत्यंत मोठा टॅरिफ लावल्याने एकच खळबळ उडाली. काही क्षेत्रात या टॅरिफचा प्रभाव बघायला मिळाला. मात्र, भारताचे टॅरिफमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी रशियाने मोठी योजना आखली आहे.

भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता अमेरिका सतत प्रयत्न करत आहे. डोनाल्ड ट्रम्प वेगवेगळ्या पद्धतीने भारताला अडकवताना दिसत आहेत. मात्र, अमेरिकेचा प्रचंड दबाव असताना देखील भारत झुकला नाही. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर काही क्षेत्रांमध्ये भारताचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. 100 टक्के टॅरिफ अमेरिकेने फार्मा वस्तूंवर लावल्याने भारतीय फार्मा कंपन्यांमध्ये खळबळ उडाली. आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी थेट मोठे आदेश देऊन भारताचे होणारे नुकसान भरून काढण्यास सांगितले. अमेरिकेचा प्रंचड असा दबाव असताना भारत रशियाकडून तेल खरेदी करतोय. अमेरिकेच्या विरोधात चीन देखील भारताच्या बाजूने उभा आहे. 50 टक्के टॅरिफ भारतावर लावल्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करेल, असे अमेरिकेला वाटले होते. मात्र, त्यांचा निर्णय त्यांच्यवरच उलटा पडल्याचे दिसत आहे.
रशियाने आता स्पष्ट म्हटले आहे की, टॅरिफमुळे भारताचे होणारे नुकसान आम्ही अजिबात होऊ देणार नाहीत. हेच नाही तर पुतिन यांनी स्वत: म्हटले की, ट्रम्पच्या टॅरिफमुळे भारताच्या नुकसानाची भरपाई आम्ही करणार आहोत. याबाबतचे आदेश देखील पुतिन यांनी दिली आहेत. नवी दिल्लीतून मोठ्या प्रमाणात तेलाच्या आयातीमुळे भारतासोबतचा व्यापार असमतोल कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश पुतिन यांनी सरकारला नुकताच दिले.
दक्षिण रशियाच्या काळ्या समुद्रातील रिसॉर्टमध्ये भारतासह 140 देशांच्या सुरक्षा आणि भू-राजकीय तज्ञांच्या आंतरराष्ट्रीय चर्चा मंचात बोलताना पुतिन यांनी यावर भर दिला. रशिया आणि भारत यांच्यात कधीही कोणतीही समस्या किंवा तणाव निर्माण झाला नाही. आताही भारत आणि रशिया यांच्यात कोणत्याही प्रकारचा तणाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उलट भारत रशियाची मैत्री कायम राहिल असेही त्यांनी म्हटले.
पुतिन यांनी पुढे बोलताना म्हटले की, भारतावर अमेरिकेचा दबाव आहे. भारतातील प्रत्येकाला माहिती आहे की, भारत रशियाकडून तेल का खरेदी करतोय. अमेरिकेने भारतावर जो टॅरिफ लावला, त्याचे होणारे नुकसान रशिया भरून काढणार आहे. रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीद्वारे ही नुकसान भरून काढली जाईल. आता पुतिन यांचे बोलणे ऐकून अमेरिकेला नक्कीच मोठा धक्का बसला असावा.
