कोरोनाची लस बनवणाऱ्या वैज्ञानिकाची हत्या, अख्खं जग मृत्यूशय्येवर पडलेलं असताना ‘संजीवनी’ निर्माण करणाऱ्यासोबत हे काय घडलं?

कोरोनाची लस तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वैज्ञानिकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटना समोर आल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे.

कोरोनाची लस बनवणाऱ्या वैज्ञानिकाची हत्या, अख्खं जग मृत्यूशय्येवर पडलेलं असताना 'संजीवनी' निर्माण करणाऱ्यासोबत हे काय घडलं?
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 5:14 PM

मुंबई : कोरोना संकट काळात (Corona) जगाला दिलासा देण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजवणाऱ्या रशियाच्या एका वैज्ञानिकाची गळा घोटून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित बातमी समोर आल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. ज्या व्यक्तीने जगाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले त्याच व्यक्तीची निर्घृणपणे हत्या कशी काय केली जाऊ शकते? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. रशियाचे वैज्ञानिक आंद्रे बोतिकोव (Andrey Botikov) यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय.

रशियाच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आंद्रे बोतिकोव यांची त्यांच्या राहत्या घरी गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी तपास करत एका संशयिताला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत. पण आंद्रे बोतिकोव यांनी असं काय केलं होतं की ज्यामुळे त्यांची हत्या करण्यापर्यंत आरोपीची मजल गेली? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

संबंधित घटना ही गुरुवारी (2 मार्च) घडल्याची माहिती समोर आलीय. रशियाच्या ‘तास’ वृत्तसंस्थेने इन्वेस्टिगेटिव्ह कमेटी ऑफ रशिया फेडरेशनचा हवाला देत माहिती दिली. मृतक वैज्ञानिक हे गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अँड मॅथमेटिक्सचे ज्येष्ठ संशोधक म्हणून काम करायचे. ते 47 वर्षांचे होते. गुरुवारी त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांचा तपास कुठपर्यंत पोहोचला?

आंद्रे बोतिकोव यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या समितीने टेलिग्रामवर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल. आतापर्यंत करण्यात आलेल्या पोलीस तपासानुसार, एका 29 वर्षीय तरुणासोबत बोतिकाव यांचा वाद झाला. हा वाद पुढे जास्त चिघळला. त्यानंतर तरुणाने संतापात बोतिकोव यांचा बेल्टच्या सहाय्याने गळा घोटत हत्या केली. आरोपी तरुणाने बोतिकोव यांची हत्या केल्यानंतर तो घटनास्थळाहून फरार झालाय. पण पोलिसांनी संबंधित संशयित तरुणाला अटक केल्याची माहिती तपास करणाऱ्या समितीने दिली आहे.

दिवंगत वैज्ञानिक हे मोठ्या पुरस्काराने सन्मानित

कोरोना काळात स्पुतनिक लस निर्मिती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी 2021 मध्ये आंद्रे बोतिकोव यांना पुरस्कार देवून सन्मानित केलं होतं. त्यांना ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. स्पुतनिक लस बनवण्यासाठी 20 वैज्ञानिकांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली. आंद्रे बोतिकोव हे त्यापैकीच एक होते.

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.