हजारो करोडो वर्षांपूर्वी मंगळावर होते पाणीच पाणी…. विशाल महासागराबाबत शास्त्रज्ञांना सापडले खळबळजनक पुरावे

विशेष मोहिमेअंतर्गत मंगळावर संशोधन करणाऱ्या रोव्हरने मंगळावर पाणी असल्याचे अनेक पुरावे दिले आहेत. 350 दशलक्ष वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर एक मोठा महासागर होता.

हजारो करोडो वर्षांपूर्वी मंगळावर होते पाणीच पाणी.... विशाल महासागराबाबत शास्त्रज्ञांना सापडले खळबळजनक पुरावे
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 7:31 PM

वॉशिंग्टन : मंगळग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी  संशोधक अथक परिश्रम घेत आहेत. लवकरच याचा उलगडा होणार आहे. हजारो करोडो वर्षांपूर्वी मंगळावर विशाल महासागर होता असा दावा केला जात आहे. या संदर्भात संशोधकांना खळबळजनक पुरावे सापडले आहेत. मंगळ ग्रहाबाबत शास्त्रज्ञ सातत्याने संशोधन करत आहेत. विशेष मोहिमेअंतर्गत मंगळावर संशोधन करणाऱ्या रोव्हरने मंगळावर पाणी असल्याचे अनेक पुरावे दिले आहेत. 350 अब्ज वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर एक विशाल महासागर होता. हा महासागर शेकडो हजार चौरस किलोमीटरपर्यंत पसरला होता. या दाव्याला संशोधकांनी दुजोरा दिला आहे.

मंगळ हा पूर्णपणे कोरडा ग्रह मानला जातो. इथे फक्त धुळीचे साम्राज्य आहे. 350 दशलक्ष वर्षांपूर्वी, मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर विशाल महासागर अस्तित्वात होता. हा महासागर लाखो चौरस किलोमीटरमध्ये पसरला होता. या संदर्भातील पुरावे शास्त्रज्ञांच्या हाती लागले आहेत.

सॅटेलाईट इमेजमध्ये मंगळ ग्रहावर महासागर अस्तित्वात असल्याच्या खाणखुणा सापडल्या आहेत. नद्यांनी उंचावलेल्या 6,500 किमी पेक्षा जास्त प्रवाही पर्वतरांगा सॅटेलाईट इमेजमध्ये दिसत आहेत. तसेच डेल्टा नदी प्रदेशात पाणबुडीचे पट्टे देखील सापडले आहेत.

महासागराच्या या खाणाखुणांवरुन एकेकाळी मंगळ ग्रहावर मुबलक पाणी होते असा दावा केला जात आहे. मात्र, या पाण्याचे काय झाले यावर देखील संशोधन सुरु आहे.

मंगळ ग्रहावर काही काळासाठी दुष्काळ तर काही काळामध्ये पाणी उपलब्ध असल्याची माहिती यापूर्वी देखील समोर आली होती. यापूर्वी Chemcam उपकरण आणि टेलिस्कोपद्वारे सेडिमेंटरीच्या तळाचा अभ्यास करण्यात आला होता.

मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचं संशोधन करणाऱ्या नासाच्या Curiosity रोवरनं महत्वाची माहिती मिळवली होती. मगंळ ग्रहावरील पृष्ठभागावर फिरणाऱ्या रोव्हरला तळाच्या भागात ओली माती दिसून आली आहे. त्याच्यावरील थरात वाळूची रचना आढळली होती.

आता या सॅटेलाईट इमेजमध्ये नदी, समुद्र तसेच पाण्याच्या प्रवाहाच्या खामाखुणा स्पष्टपणे दिसत आहेत. यामुळे संशोधकांच्या प्रयत्नांना मोठं यश आले आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.