बलूचीस्तानात २४ तासात पाकिस्तानी लष्करावर दुसरा मोठा हल्ला, अनेक जवान जखमी

बलुचीस्तानात २४ तासात पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे अनेक जवान जखमी झाले आहेत. हा हल्ला केच जिल्ह्यात झाला असून हल्लेखोरांनी पाकिस्तानी सैन्यांच्या तुकडीवर बॉम्बने हल्ला केला आहे.

बलूचीस्तानात २४ तासात पाकिस्तानी लष्करावर दुसरा मोठा हल्ला, अनेक जवान जखमी
Second major attack on Pakistani army in 24 hours in Balochistan, many soldiers injured
| Updated on: Mar 15, 2025 | 3:03 PM

बलुचीस्तानातील हल्लेखोरांनी पाकिस्तानला सळो की पळो करुन सोडले आहे. ट्रेनचे अपहरण करुन अनेकांना ठार केल्याच्या घटनेला २४ तास उलटतात न उलटतात तोट बलुची गटाने दुसरा मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेक सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून हल्लेखोरांनी पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीवर बॉम्ब हल्ला केल्याचे म्हटले जात आहे.

बलुची सैनिकांनी शुक्रवारी पाकिस्तानातील ओलीस ठेवलेल्या २१४ जवानांना ठार केले आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने म्हटलेय की पाकिस्तानी सैन्याला कैद्यांच्या अदला – बदली साठी ४८ तासांचा अल्टीमेटम दिला होता. परंतू शहबाज सरकार आणि पाकिस्तानी सैन्यांच्या वतीने कोणतेही उत्तर न आल्याने त्यांच्या हट्टामुळे २१४ जवानांच्या प्राणाची किंमत त्यांना मोजावी लागल्याचे बलुचीस्तान लिबरेशन आर्मीने म्हटले आहे.

पाक सैन्याचे ऑपरेशन संपल्याचा दावा

बलुचिस्तान ट्रेन हल्ल्यात मृत्यूमुखी झालेल्या २६ ओलीसांपैकी १८ सुरक्षा दलाचे जवान होते. इंटर सर्व्हीसेज पब्लिक रिलेशन्सचे ( ISPR ) महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी म्हटले आहे की सैन्याच्या मोहीमेच्या सुरुवात करण्याआधी अतिरेक्यांनी २६ ओलीसांना ठार मारले होते. १८ सुरक्षा दलाचे कर्मचाऱ्यांशिवाय तीन अन्य सरकारी अधिकारी आणि पाच नागरिकांचा त्यात समावेश आहे.

BLA ने जाफर एक्सप्रेसचे केले होते अपहरण

पाकिस्तानी लष्कराने ३३ हल्लेखोरांना ठार केल्याचा दावा केला आहे. तर ३०० हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचविल्याचे पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे. एकूण ३५४ जणांना हल्लेखोरांनी ओलीस ठेवले होते. त्यात ३७ जखमी प्रवासी होते. बोलन परिसरातून जाणाऱ्या ४०० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसचे मंगळवारी बलुचीस्थानी लिबरेशन आर्मीने अपहरण केले होते.

बलूच सेनाने घात लावून केला ट्रेनवर हल्ला

नेहमीच्या दिवसाप्रमाणे ११ मार्च रोजी जाफर एक्सप्रेस क्वेटाहून पेशावरला रवाना झाली होती.ट्रेनमध्ये चारशे हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. बलोनच्या डोंगराळ भागातून ट्रेन जात असताना घात लावून बसलेल्या बलुच सैन्याच्या लढावू्ंनी ट्रेनवर हल्ला करुन तिचे अपहर केले होते. यात ५८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात २१ प्रवासी होते.