Ajit Pawar Plane Accident Report : अजितदादांच्या विमान अपघाताच्या अहवालाने खळबळ, ब्लॅक बॉक्सबाबत धक्कादायक माहिती समोर!
. रोहित पवार यांच्या दाव्यानुसार अजितदादांच्या विमान अपघाताविषयी शंका उपस्थित केली जात आहे. असे असतानाच आता डीजीसीएचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे.

Ajit Pawar Plane Accident Report : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अजूनही वेगवेगळे दावे केले जात आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे नेते रोहित पवार यांनी अजितदादांसोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा दावा करताना त्यांनी अनेकदा पत्रकार परिषदा घेऊन वेगवेगळे फोटो, कागदपत्रे दाखवलेले आहेत. रोहित पवार यांच्या दाव्यानंतर अजितदादांच्या विमान अपघाताविषयी शंका उपस्थित केली जात आहे. असे असतानाच आता डीजीसीएचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे. या अहवालात अनेक महत्त्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आलेली आहेत. या अहवालानुसार ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर खराब झाल्याचे सांगण्यात आले आहे.
22 पानांचा अहवाल समोर
या अहवालानुसार अपघातादरम्यान विमान अगोदर झाडावर आदळले. त्यानंतर विमान जमिनीवर आदळले. पुढच्याच क्षणी विमानाचा मोठा अपघात झाला. समोर आलेला हा अहवाल 22 पानांचा आहे. अपघातानंतर विमानाचा स्फोट झाला. या स्फोटानंतर उष्णतेमुळे ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर खराब झाले असे या अहवालातातून समोर आले आहे. याच अहवालात हा अपघात एकाच कारणामुळे नव्हे, तर हवामान, पायाभूत सुविधा, ऑपरेशनल निर्णय यांच्या संयोगामुळे घडल्याचा तात्पुरता निष्कर्ष काढण्यात आला आहे. अपघाताचे अंतिम कारण CVR/FDR सविस्तर विश्लेषणानंतर स्पष्ट होणार आहे.
अपघात नेमका कशामुळे झाला? कारण काय?
अजितदादांच्या विमान अपघाताची काही संभाव्य कारणं या प्राथमिक अहवालात सांगण्यात आली आहेत. यामध्य VFR minima पेक्षा कमी दृश्यमानता, अनकंट्रोल्ड एअरफिल्डची अपुरी पायाभूत सुविधा, टेबल-टॉप रनवे तसेच फिकट मार्किंग, मानवी घटक/दृश्य भ्रम (visual illusion), MET माहितीची मर्यादित अचूकता अशी काही या अपघाताची कारणं आहेत. विमानतळावर रनवे मार्किंग फिकट फिकट होती. सोबतच रनवेवर सैल खडी, पुरेशी कुंपण/सीमा भिंत नाही असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.
विमानाने तत्काळ नियंत्रण गमावले
यासह विमानात VIP/चार्टर जेटसाठी आवश्यक असलेली मूलभूत सुरक्षा व नेव्हिगेशन सुविधाही बारामतीच्या विमानतळावर अपुरी आहे. विमानाने तत्काळ नियंत्रण गमावल्याचाही संकेत या तात्पुरत्या अहवालात देण्यात आला आहे. दरम्यान, आता या तात्परुत्या अहवालानंतर भविष्यात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठराणार आहे.
