इस्लामाबाद : उत्तर पाकिस्तान हा जगाचं लक्ष्य वेधून घेणारा रहस्यमय भाग आहे. या भागातील हुंजा व्हॅली (हुंजा खोरं) खूप रहस्यांनी भरलेली असल्याचं मानलं जातं. पाकिस्तानचं सरासरी आयुर्मान 67 वर्षे असताना या ठिकाणचे लोक तब्बल 120 वर्षे ते 150 वर्षे जगतात. ब्रिटिश वृत्तपत्र टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार उत्तर पाकिस्तानमधील हा हुंजा समुह जगासाठी एक रहस्य बनला असून यावर संशोधन होणं आवश्यक आहे (Secret of Long life of Hunja tribal community in north Pakistan).