सर्बियाच्या संसदेत अभूतपूर्व गोंधळ, खासदारांनी स्मोक ग्रेनेड फेकले, जोरदार बाचाबाची अन्…
Serbian parliament protest : संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोठा गदारोळ केला. खासदारांनी संसदेत धुराचे ग्रेनेड फेकले. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये बाचाबाचीही झाली.

दक्षिण युरोपातील सर्बियाच्या संसदेत मोठा अभूतपूर्व गोंधळ झाला आहे. संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोठा गदारोळ केला. खासदारांनी संसदेत धुराचे ग्रेनेड फेकले. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये बाचाबाचीही झाली. यामुळे सर्बियाच्या संसदेच्या अधिवेशनात प्रचंड गोंधळ उडाला. थेट दूरचित्रवाणीवरुन या गोंधळाचे प्रसारण झाले. या प्रकरणात दोन सदस्य जखमी झाले आहे.
सर्बियन विरोधी पक्षाच्या खासदारांनी मंगळवारी संसदेच्या आत स्मोक ग्रेनेड आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फेकल्या. विरोधी पक्ष सरकारी धोरणांचा निषेध करत होते. सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विरोधी पक्षाचे खासदारही पाठिंबा देत होते. त्यावेळी विरोधी खासदारांनी स्मोक ग्रेनेड आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सर्बिया संसदेच्या अधिवेशनाचे थेट प्रसारण दूरचित्रवाणी होते. त्यामुळे संसदेतील हा अभूतपूर्व गोंधळ संपूर्ण जगाने पाहिला.
Chaos in the Serbian 🇷🇸 parliament this morning. pic.twitter.com/IQO3zpPQ3L
— Based Serbia (@SerbiaBased) March 4, 2025
का सुरु झाला गोंधळ
चार महिन्यांपूर्वी सर्बिया रेल्वे स्टेशनचे छप्पर पडले होते. त्यामुळे 15 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकारविरोधात देशभर प्रदर्शन सुरु झाले. संसदेच्या अधिवेशनात सर्बियाई प्रगतिशील पार्टी (एसएनएस) च्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पक्षाने अजेंडा मंजूर केला. त्यानंतर विरोधक अध्यक्षाच्या आसनाकडे धावले. त्यावेळी सुरक्षा रक्षकांबरोबर हाथापाई झाली.
BREAKING The Parliament of Serbia right now! The Parliament was due to Tuesday adopt a law increasing funds for universities – one of the main demands of students blocking faculties since December.Another demand was about resignation of Prime Minister Milos Vucevic. pic.twitter.com/NUHPZDSH3J
— Ukraine Front Line (@EuromaidanPR) March 4, 2025
सर्बियाच्या संसदेत देशातील विद्यापीठांचे शुल्क वाढवणारा कायदा संमत होणार होता. या कायद्याच्या विरोधात देशभरात विद्यार्थी निर्देशने करत आहे. तसेच सभागृहात पंतप्रधान मिलोस वुसेविक यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार होती. परंतु सत्ताधारी पक्षाने अजेंडामध्ये हा विषय घेतला नाही.

सर्बिया संसदेत गोंधळ
संसदेचे अध्यक्ष एना ब्रनाबिक यांनी या गोंधळात दोन सदस्य जखमी झाल्याचे म्हटले आहे. त्यात एसएनएस पार्टीचे जैस्मिना ओब्राडोविक यांची प्रकृती गंभीर आहे.
