
डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्षपद डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आहे. मात्र, आपल्या दुसऱ्या कार्यकाळात धक्कादायक निर्णय घेताना डोनाल्ड ट्रम्प दिसत आहेत. जगासमोर टॅरिफसारखे मोठे संकट त्यांनीच उभे केले. डोनाल्ड ट्रम्प यांना दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्षपद मिळावे, याकरिता भारताने मोठी मदत केली. हेच नाही तर ज्या भागात भारतीय वंशाचे अमेरिकन मतदार आहेत, त्या भागात स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी गेले होते. मात्र, दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर भारताविरोधात धक्कादायक निर्णय घेताना डोनाल्ड ट्रम्प दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच घोषणा केली की त्यांच्या धोरणामुळे अमेरिकेला पूर्वीचे दिवस आले असून अमेरिका पुन्हा एकदा श्रीमंत बनली आहे. टॅरिफमुळे मोठा पैसा अमेरिकेत येत असल्याचेही त्यांनी मान्य केले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अमेरिकेत 18 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक आली. अमेरिकेने भारतासह अनेक देशांवर मोठा टॅरिफ लावला आहे. ज्यामुळे अमेरिकेला मोठा फायदा होत आहे. फक्त अमेरिकाच नाही तर डोनाल्ड ट्रम्प देखील यादरम्यानच्या काळात मोठा पैसा कमावताना दिसत आहेत. शिवाय त्यांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होताना दिसत आहे.
अमेरिकन वृत्तपत्र ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या एका अहवालानुसार, जानेवारी 2025 मध्ये पुन्हा सत्तेवर आल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत 1.4 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम अंदाजे 13,000 कोटी रुपये इतकी आहे. अचानक डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत वाढ झाली. फक्त अमेरिकाच नाही तर भारतासह अनेक देशांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पैसा गुंतवला आहे.
पुण्यातही डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती आहे. ट्रम्प यांची सध्याची एकूण संपत्ती अंदाजे 7.3 अब्ज डॉलर्स आहे. काही अहवालांनुसार, प्रत्यक्षात यापेक्षाही त्यांची संपत्ती अधिक असून शकते. कारण त्यांच्या उत्पन्नाचे अनेक स्रोत पूर्णपणे सार्वजनिक नाहीत. त्याबद्दल फार काही माहिती कुठेच नाहीये. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.