कोणत्याही क्षणी होऊ शकते थेट मोठी घोषणा, व्लादिमीर पुतिन यांची रात्रभर बैठक, जगाचे..
रशिया आणि युक्रेन युद्ध गेल्या 4 वर्षांपासून सुरू आहे. हे युद्ध रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आली. मात्र, यश मिळाले नाही. काही दिवसांपूर्वीच व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले की, आम्ही फक्त युक्रेनसोबत युद्ध लढत नाहीत, संपूर् नाटो देशांसोबत लढत आहोत. त्यामध्येच आता मोठी अपडेट आलीये.

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन युद्धाबाबत शांतता प्रस्ताव मांडताना दिसत आहेत. गेल्या 4 वर्षांपासून रशिया युकेन युद्ध सुरू असून या युद्धाचा थेट परिणाम जगाला भोगावा लागत आहे. अमेरिकेने यापूर्वी .युक्रेन आणि रशियाला शांतता प्रस्ताव दिला. मात्र, युकेनने त्या प्रस्तावाला विरोध दर्शवला. कोणत्याही परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध रोखायचे असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे रशिया युक्रेन युद्ध रोखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा जावई देखील प्रयत्न करत असून रशियासोबत चर्चा करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बोर्ड ऑफ पीस स्थापन केल्यानंतर रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये रात्रभर चर्चा झाली. अमेरिकी दूत स्टीव विटकॉफ आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर रशियाच्या राष्ट्रपती भवनच्या क्रेमलिनमध्ये होते. ही बैठक युक्रेनसोबतचे युद्ध थांबवण्याबद्दल होती. विशेष म्हणजे या बैठकीत स्वत: व्लादिमीर पुतिन हे देखील उपस्थित होते.
या बैठकीत पुतिन यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, त्यांच्याकडे असलेल्या भागाला मान्यता मिळावी आणि युक्रेनने त्यावरील दावा सोडावा, त्यानंतर हे युद्ध थांबू शकते. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेसेंस्की यांनी यापूर्वी बऱ्याचदा सांगितले की, आम्ही कधीच आमच्या क्षेत्रातील भागावरील अधिकार सोडणार नाहीत. यादरम्यान जेलेंस्की यांनी म्हटले की, रशियावरील हल्ल्यासाठी आम्हाला युरोप किंवा अमेरिकेकडून मदत मिळत नाहीये. त्यांनी असेही म्हटले की, सध्या परिस्थिती अशी आहे की, आम्ही सर्वकाही व्लादिमीर पुतिन यांच्या दयावर सर्वकाही सोडले आहे.
रशियाने या बैठकीनंतर स्पष्ट केले की, रशियाच्या ताब्यात जो प्रदेश आहे, त्याला मान्यता मिळाली पाहिजे. युक्रेनकडून याला जोरदार विरोध केला जात आहे. जेलेंस्की यांचे म्हणणे आहे की, पूर्व युक्रेनमधील भागात रशियाचा काही भागात ताबा आहे आणि तो अवैध आहे, तो आमचा भाग आहे तो कधीही रशियाचा होऊ शकणार नाही. दावोसमधील बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांना जेलेंस्की यांनी सांगितले की, पूर्व युक्रेनच्या काही भागात रशियाने ताबा मिळवला आहे.
हा प्रश्न अजून तसाच आहे आणि दुसरीकडे शांतता प्रस्ताव देखील पूर्ण जवळपास झाला. या दोन्ही देशांमध्ये जवळपास 2014 पासून संघर्ष बघायला मिळत आहे. 2022 मध्ये प्रत्यक्षात युद्ध सुरू झाले. त्यादरम्यान कोणालाही वाटले नव्हते की, इतकी वर्ष युद्ध सुरू राहिल. रशियाने या काळात जवळपास 20 टक्के युक्रेनला ताब्यात घेतला आहे. यादरम्यानच 27 देशांवर भडकत जेलेंस्की यांनी म्हटले की, युरोपियन यूनियन आमची मदत करत नाहीये.
