इंडोनेशियात एकाच वेळी 6 ज्वालामुखींचा उद्रेक; शाळकरी मुलांची जीव वाचवण्यासाठी धडपड, व्हिडिओ पाहून हादरून जाल
इंडोनेशियात ज्वालामुखींचा उद्रेक पाहायला मिळत आहे. या ज्वालामुखीमुळे हवेत राखेचे लोट पसरत आहे. या घटनेदरम्यान शाळकरी मुलांची जीव वाचवण्यासाठी धडपड कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

इंडोनेशियात काही दिवसांपूर्वी सकाळी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर राखेचे लोट हवेत सर्वत्र पसरले. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ज्वालामुखीचा उद्रेक सुरु असताना दुसरीकडे जनजीवन सुरळीत आहे. परंतु नागरिकांमध्ये ज्वालामुखीची भीती कायम आहे. शाळा आणि डोंगराळ भागाजवळ झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे विद्यार्थ्यांची एकच धावाधाव होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एका पाठोपाठ सहा ज्वालामुखींचा उद्रेक झाल्यामुळे घाबरून विद्यार्थ्यांची जीव वाचवण्यासाठी एकच धावाधाव झाली. तर काही जण निडरपणे हवेत पसरलेल्या राखेकडे पाहत बसले होते. या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
इंडोनेशियातील भूवैज्ञानिक संस्थेनुसार, मागील शुक्रवारपासून जमिनीच्या भूगर्भात हालचाली वाढल्या होत्या. त्यानंतर रविवारी सकाळी 3.53 वाजता 30 सेकंदात ज्वालामुखीचा उद्रेक झाला. ज्वालामुखीचा लावा देखील सर्वत्र पसरला. काही ठराविक वेळेनंतर इंडोनेशियातील काही भागात ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. या घटनेत कोणतीही जिवीनहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. या ज्वालामुखीच्या उद्रेकापासून 3 किलोमीटर दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
एकीकडे इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना शाळा, उद्योग सुरूच आहे. इंडोनेशियातील एका शाळेजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांची जीव वाचवण्यासाठी एकच धडपड सुरू झाली. काही पालकांना माहिती मिळताच मुलांना घेण्यासाठी शाळेत पोहोचले. तर काही मुले शाळेच्या आवारात भीतीने ओरडू लागले. तर काही विद्यार्थी ज्वालामुखीच्या राखेचे लोट पाहण्यासाठी रस्त्यावरच थांबल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही जण पालक दुचाकी घेऊन मुलांना घेऊन जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इंडोनेशिया में एक साथ 6 ज्वालामुखी फटे है जिसके कारण आस पास के इलाको में आपात स्थिति बनी हुई है pic.twitter.com/LkNaOKRV2m
— Ganesh Godara (@guneshgodara) September 9, 2026
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर एका युजरने म्हटलं की, ‘निसर्गाचा खेळ आहे. आपण त्याला काही करू शकत नाही. लहान मुलांना घटनास्थळावरून सुरक्षित ठिकाणी नेलं पाहिजे. या प्रकरणी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजे’. तर दुसऱ्या युजरने म्हटलं की, आता पूर्ण जगात दहशत पसरली आहे. अनेक ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. काही ठिकाणी कोरडा दुष्काळ झाला आहे. या घटनेने जगावर परिणाम झाला आहे’.
