मोठी बातमी! बंगालच्या खाडीत युद्धाची तयारी, पाकिस्तान, बांगलादेशाला हाताशी धरून चीनने पाठीत खुपसला खंजीर, थेट..
भारताचे शेजारी देश एकत्र येत भारताविरोधात मोठे षडयंत्र रचत असल्याचे रिपोर्टमधून पुढे आलंय. नुकताच धक्कादायक अशी रिपोर्ट पुढे आली. बंगालच्या खाडीत मोठ्या घडामोडी घडत असून बांगलादेश, चीन, आणि पाकिस्तान भारताविरोधात एकत्र आल्याचे दिसतंय.

सध्याच्या बदललेल्या परिस्थितीमुळे भारताला शेजारी देशांपासून मोठा धोका निर्माण झाला. पाकिस्तानसोबत भारताचे संबंध कायमच तणावात राहिले. थोड्या कमी प्रमाणात चीनसोबतही सीमेवर तणाव राहिला आहे. मात्र, अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर कुठेतरी भारत आणि चीनमधील संबंध सुधारल्याचे बघायला मिळाले. पण हे संबंध फक्त बैठकांपुरतेच मर्यादित राहताना दिसत आहेत. सीमेवर भारतावरील दबाव राखण्याचे काम सुरू आहे. बंगालच्या खाडीत कायमच भारताचे वर्चस्व राहिले. मात्र, चीन आणि पाकिस्तान एकत्र येऊन भारतावरील वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. चीन बंगालच्या उपसागरात आपली युद्धनौका सतत पाठवत आहे. पाकिस्तानला चीनकडून थेट पाठिंबा मिळत आहे. आता बांगलादेशही भारताच्या शत्रूंच्या गटात सामील झाला आहे. त्यामुळे भारतासमोर मोठे आव्हान आहे.
गेल्या दशकात चीन बंगालच्या उपसागरात आपला प्रभाव वेगाने वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रदेशात चिनी नौदलाची सर्वेक्षण जहाजे, गुप्तचर जहाजे आणि पाणबुड्या वारंवार दिसत आहेत. फ्रेंच गुप्तचर संस्था अनसीन लॅब्सने अहवाल दिला आहे की, एक चिनी संशोधन जहाज भारतीय सागरी सीमेजवळ बंगालच्या उपसागरात कार्यरत होती. या अहवालानंतर मोठी खळबळ उडाली.
चीनच्या हेरगिरीमुळे चिंता वाढली आहे. रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, फ्रिगेट आणि सहाय्यक जहाजांसह चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी नौदलाच्या जहाज अंदमान समुद्रातून गेले. चीनने बांगलादेश नौदलाला आधीच दोन पाणबुड्या पुरवल्या आहेत, बंगालच्या उपसागरातील चीनच्या धोरणाचा बांगलादेश अगोदरपासूनच महत्वाचा भाग राहिला आहे. आता त्यामध्येच भारताची आणखीन डोकेदुखी वाढली.
या सर्व घडामोडींवर भारताचे बारीक लक्ष आहे. भारत फक्त शांतपणे बघत नाही तर सर्व गोष्टी समजून घेत आहे. भारताकडूनही तयारी केली जात आहे. 23 डिसेंबर 2025 रोजी भारताने बंगालच्या उपसागरात अणुशक्तीवर चालणाऱ्या आयएनएस अरिहंत पाणबुडीतून के-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. वृत्तांनुसार, भारतीय नौदलाने पश्चिम बंगालमधील, बांगलादेश सीमेजवळ असलेल्या हल्दिया येथे एका नवीन बेसचे बांधकाम सुरू केले आहे. भारताकडूनही जोरदार तयारी केली जात आहे. बंगालच्या खाडीत सध्या घडामोडींना वेग येत असून चीन सतत कुरापती करताना दिसत आहे.
