AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेतून तब्बल इतक्या भारतीयांची हकालपट्टी, धक्कादायक आकडेवारी, कोणी…

भारत आणि अमेरिकेतील वाढलेल्या तणावाचा फायदा पाकिस्तान घेताना दिसला. आता पुन्हा एकदा भारत आणि अमेरिकेतील चांगले संबंध दिसून येत आहेत. भारतावरील टॅरिफबद्दल अत्यंत मोठा निर्णय अमेरिकेने घेतला.

अमेरिकेतून तब्बल इतक्या भारतीयांची हकालपट्टी, धक्कादायक आकडेवारी, कोणी...
US
| Updated on: Feb 07, 2026 | 9:41 AM
Share

अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांना कारभार हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प धक्कादायक निर्णय घेताना दिसले. भारताबद्दलची त्यांची थेट भूमिका बदलली. H-1B व्हिसाच्या नियमात मोठे बदल केले. ज्यामुळे भारतीयांना अमेरिकेत जाणे कठीण झाले. भारतावर अमेरिकेने फक्त टॅरिफ लादला नाही तर अनेक धमक्याही दिल्या. आता काही महिन्यानंतर भारत आणि अमेरिकेतील संबंध चांगले होताना दिसत आहेत. भारतावरील टॅरिफ काही टक्के मागे घेण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. मात्र, H-1B व्हिसातील बदललेल्या नियमात कोणतीही शिथिलता देण्यात आली नाही. यासोबतच H-1B व्हिसावर मोठे शुल्क आकारले. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या H-1B व्हिसाधारकांच्या मुलाखती काही महिन्यांकरिता पुढे ढकलण्यात आल्या असून अजूनही त्यांना तारखा देण्यात आल्या नाहीत. H-1B व्हिसासंदर्भातील प्रक्रिया अधिक किचकट करण्यात आली.

व्हिसा संपल्यानंतरही अमेरिकेत राहणाऱ्या लोकांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशनमध्ये मोठा बदल केला. अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्यांना त्यांच्या देशातून हाकलून दिले. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या या कारवाईचा फटका भारतीयांनाही मोठ्या प्रमाणात बसला. डिसेंबर 2025 पर्यंत तब्बल 3 हजार 800 हून अधिक भारतीय नागरिकांना अमेरिकेतून हाकलून देण्यात आले.

याबाबतची माहिती संसदेत सादर करण्यात आली. फक्त अमेरिकाच नाही तर साैदी अरेबिया, मलेशिया, अरब अमिराती, थाडलंड, बहरीन, कंबोडिया, कॅनडा,, चीन, युनायडेट किंगडम अशा काही देशांचाही समावेश आहे, ज्या देशातून बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांना परत भारतात पाठवण्यात आले.

व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अमेरिकेत राहणाऱ्या लोकांविरोधात मोठी कारवाई प्रशासनाकडून केली जात आहे. बऱ्याचदा विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी जातात आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करतात. मात्र, यादरम्यान त्यांच्या व्हिसाची मुदत मात्र संपलेली असते. फक्त भारतच नाही तर अनेक देशातील नागरिकांविरोधात अमेरिका कारवाई करत आहे. फस्ट अमेरिका हे धोरण डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राबवले जात आहे. अमेरिकेत जाऊन नोकरी करण्यामध्ये भारत आणि चीनमधील लोक सर्वाधिक आहेत. नोकरीला गेल्यानंतर ते बऱ्याचदा तिथे स्थायिकही होतात.

Follow Us
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप