strait of hormuz : इंधनाच्या जहाजांना खालून फाडतात इराणचे समुद्री सुरुंग, भारताकडेही आहेत का?

इराणने आता होर्मुज स्ट्रेट बंद करण्यासाठी समुद्री सुरुंग पेरण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने जर होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल जहाजे रोखली तर इराणवर २० पट हल्ले करणार अशी धमकी दिली आहे.

strait of hormuz : इंधनाच्या जहाजांना खालून फाडतात इराणचे समुद्री सुरुंग, भारताकडेही आहेत का?
Strait of Hormuz
| Updated on: Mar 12, 2026 | 8:06 PM

इराणवर इस्राईल आणि अमेरिकेने यु्द्ध लादल्यानंतर इराणने आता अमेरिकेचे नाक दाबण्यासाठी त्यांच्या होर्मुज सामुद्रधुनीत समुद्री सुरुंग पेरले आहेत. त्यामुळे अमेरिकन आणि इस्राईल जहाजांना टार्गेट करणे सोपे होणार आहे. अमेरिकेनेही सांगितले आहे की इराणच्या माईनलेयर्स म्हणजे समुद्री सुरुंग पेरणाऱ्या जहाजांना नष्ट घेतल्याचे म्हटले आहे. अलिकडेच त्यांनी १६ माईनलेयर्सना नष्ट केल्याचा दावा केला आहे. असे म्हटले जात आहे की या प्रकारचे समुद्र सुरुंग भारताकडेही नाहीत. इराणकडे असे किती समुद्री सुरुंग आहेत याची आकडे त्यांनी जाहीर केलेली नाही. परंतू काही बातम्यांनुसार समुद्राच्या तळाशी इराणने 2,000 ते 6,000 समुद्री सुरुंग पेरलेले आहेत. जहाज त्यांच्यावरुन जाताच त्यांचा मोठा स्फोट होतो.

इराणकडे दोन प्रकारचे माईन्स

वेबसाईट Sino Defence ने दिलेल्या माहितीनुसार इराणकडे माईन्स लेइंग आणि माईन्स स्टॉक्स दोन्हींची क्षमता आहेय इराणने अनेक वर्षांपूर्वी सोव्हीएत संघ, पश्चिम देशासोबत या माईन्ससाठी अनेक करार केले आहेत. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की इराणने EM-52 रॉकेट प्रोपेल्डची खरेदी केली आहे. इराणने चीनकडून अनेक माईन्स खरेदी केले आहेत.

इराणला रशिया-चीन, उत्तर कोरियाची मदत

अमेरिकन तज्ज्ञांच्या मते इराणच्या शस्रसाठ्यात किमान 2,000 असे माईन्स आहेत. इराणकडे खूपच नवीन, एडव्हान्स माईन्स आहेत. या समुद्री सुरुंगांना इराणने रशिया, चीन आणि उत्तर कोरियाकडून मिळवले आहे. इराणने तेल टँकरच्या विरोधात युद्ध सुरु केले आहे. त्यासाठी त्याने समुद्रात सुरुंग पेरलेले आहेत. पहिल्या जागतिक महायुद्धापासून या समुद्री सुरुंगांचा खूप वापर केला जात आहे. हे सुरुंग इराणला युद्धात आघाडी देऊ शकतात. जगाच्या इंधन व्यापाऱ्याची नस म्हटली जाणारी होर्मुज सामुद्रधुनीत वर्चस्व राखण्यासाठी इराणला हे समुद्री सुरुंग खूपच मदतगार सिद्ध होऊ शकतात.

समुद्री सुरुंग टॉरपिडो मिसाईलहून भयानक

टॉरपिडो वा एंटी शिप क्रुझ मिसाईलच्या तुलनेत समुद्री सुरुंग वापरण्यास सोपी असते. यांची पेरणी देखील सोप्या पद्धतीने केली जाते. होर्मुज स्ट्रेटमध्ये अशा प्रकारचे समुद्री सुरुंग इराणने परलेले आहेत.

इराणकडे EM-52 माईन्स पेरणारी वाहने कमी

मात्र इराणकडे हे समुद्र सुरंग पेरणारी EM-52 ही वाहने कमी असल्याने त्यांची चिंता वाढली आहे. इराणकडे केवळ तीन किलो क्लास पानबुड्या आहेत. जी समुद्रात शक्तीशाली EM-52 माईन्स पेरु शकतात. अशा इराण छोट्या बोटींच्या मदतीने इतर प्रकारे देखील माईन्स पेरु शकतो. मात्र, त्याला किती यश मिळेल हे संशयास्पद आहे.

का ताकदवान आहे EM-52 माईन्स

जे जहाज या EM-52 माईन्सवरुन जाते त्यात लागलीच स्फोट होतो. हा स्फोट इतका भयानक असतो की अख्खे जहाजच समुद्रात बुडते. समुद्राच्या तळाशी हे भुसुरुंग पेरले जातात. त्यावेळी याचे सेन्सर एक्टीव्ह केले जातात. जसे वरुन जहाज पास होते. तसा हा सुरुंग निशाना घेत रॉकेट्स फेकतो. ते रॉकेट जहाजाचा खालचा पत्रा फाडतो. त्यामुळे तेलाचे जहाज लागलीच बुडते.

किती प्रकारचे समुद्री सुरुंग असतात

इराणने चीनच्या मदतीने अशा समुद्री सुरुंगाची फॅक्ट्री उघडली आहे. इराणने नॉन मॅग्नेटिक, फ्री फ्लोटिंग आणि रिमोट कंट्रोल्ड माईन्स पेरलेले आहेत. इराणच्या ५० नौसैनिक जहाजांना अमेरिका आणि इस्राईलने बुडवल्याच्या दावा केला जात आहे. मात्र त्याच्याकडे अजूनही ८० टक्के छोट्या बोटी आहेत आणि त्या होर्मुझ स्ट्रेटसाठी पुरेशा असल्याचे म्हटले जात आहे.

भारतीय नौदलाकडे आहे अशी क्षमता ?

भारतयी नौदलाकडे आधी माईन्स स्वीपर होते. त्याच्याकडे माईन्स पेरण्याची क्षमता होती. भारतीय नौदलाकडे सध्या अशी माईन्स लेअर शिप नाही. मात्र, नौदलाकडे एंटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (ASW-SWC) आहेत. याच्याकडे गरज वाटेल तेव्हा माईन्स घेऊन जाणे आणि त्यांना पेरण्याची क्षमता असते. ही जहाजे किनारपट्टी आणि उथळ पाण्यात शत्रूच्या पाणबुड्यांना शोधणे आणि नष्ट करण्यासाठी बनवली आहेत. नौदलाकडे असे चार ASW-SWC आहेत. अजून १२ मिळणार आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us