AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunita williams : दोन महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सचा कॅन्सरचा धोका

सुनीता विल्यम्स तिचा सहकार बुच विल्मोर सोबत नासाच्या अंतराळ मोहिमेवर गेली आहे. पण यादरम्यान विमानातील बिघाडामुळे त्यांचा परत येण्याचा काळ वाढत चालला आहे. गेल्या २ महिन्यांपासून ते अंतराळात अडकले आहेत. त्यांना आता वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुनीता विल्यम्सला जीवाचा धोका वाढत चालला आहे.

Sunita williams : दोन महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सचा कॅन्सरचा धोका
| Updated on: Aug 17, 2024 | 8:43 PM
Share

अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकली आहे. ती स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन मिशनवर तिचा पार्टनर बॅरी विल्मोरसोबत अंतराळात पोहोचली होती. 8 महिन्यांच्या मिशनवर गेलेल्या सुनीता विल्यम्सला सध्या आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. दुसरीकडे, SpaceX मिशन क्रू ड्रॅगनच्या परतीसाठी नवीन पर्याय म्हणून ड्रॅगन कॅप्सूल वापरण्याचा विचार करत आहे. SpaceX Dragon एक चाचणी केलेले पुन्हा वापरता येणारे अंतराळयान आहे. सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना फेब्रुवारी 2025 पर्यंत ISS वर राहावे लागू शकते असे आधीच स्पष्ट केले गेले होते. कारण पुढील मिशन पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान, विल्यम्स आणि विल्मोर या अंतराळवीरांच्या अंतराळात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अंतराळात अडकले

सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुश विल्मोर यांना जूनमध्ये अंतराळात पाठवण्यात आले होते. हे दोन्ही अंतराळवीर आठवडाभरात पृथ्वीवर परतणार होते. पण ISS (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) वर उतरताच, स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये थ्रस्टर फेल्युअर आणि हेलियम लीक झाल्याने ते अडकले आहेत. त्यामुळे या दोन्ही अंतराळवीरांचे पृथ्वीवर परतणे पुढे ढकलण्यात आले होते आणि आता त्यांच्या लवकर परतण्याची आशाही धुळीस मिळाली आहे. स्पेसएक्सने त्यांचे मिशन क्रू ड्रॅगनच्या परतीसाठी प्रयत्न तीव्र केले आहेत.

गंभीर आजाराची शक्यता

क्रू ड्रॅगन मिशनच्या परतीच्या विलंबाने चिंता वाढली आहे. कारण सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर या दोन्ही अंतराळवीरांची प्रकृतीही खालावत चालली आहे. अहवालानुसार, ISS वर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या दीर्घ संपर्कापासून, सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर हाडांची समस्या, दृष्टीची समस्या इत्यादीसारख्या अनेक आरोग्य समस्यांनी ग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत डीएनए खराब झाल्याने कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

अंतराळ मोहिमांमध्ये अंतराळवीरांना किरणोत्सर्गाशी संबंधित जोखमीचा देखील सामना करावा लागतो. शरीरावर शून्य गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव देखील पडतो. याशिवाय एकटेपणामुळे मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होत असतो. सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांनी जून २०२४ मध्ये ISS चा प्रवास सुरू केला होता. ज्यामध्ये त्यांना फक्त एक आठवडा तेथे राहायचे होते. त्यानंतर ते पृथ्वीवर परतणार होते. पण आता जवळपास २ महिने उलटून गेले तरी त्यांना माघारी येण्यासाठी उशीर होताना दिसत आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.