AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात सुरक्षित शहर, तरी प्रत्येकाजवळ आहे बंदूक, कारण काय

जगात अनेक शहरं आहेत जेथे गुन्हेगारीमुळे रात्रीचं फिरणं धोकादायक असते. एक शहर असे आहे की जेथे गुन्हेगारी अगदी नसल्याच्या बरोबर असताना येथे प्रत्येकाला बंदूक जवळ बाळगावी लागते.

जगातील सर्वात सुरक्षित शहर, तरी प्रत्येकाजवळ आहे बंदूक, कारण काय
Svalbard
| Updated on: Aug 06, 2025 | 10:47 PM
Share

जगात असे अनेक शहर आहेत जेथे गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे सुरक्षेसाठी ते उत्तम देश मानले जातात. परंतू तुम्हाला हे माहीती आहे का ? एक असे शहर आहे जेथे जवळपास प्रत्येकाकडे बंदूक आहे. आणि घरातून बाहेर पडताना बंदूक बाहेर घेऊन पडावे लागते. आश्चर्याची बाब म्हणजे येथे क्राईम नसल्यात जमा आहे. तरीही हत्यार जवळ बाळगणे सर्वसामान्य बाब आहे. यामागचे कारण मोठे आश्चर्यकारक आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनुसार आर्टीक्टच्या इन्फ्लुएंसर सेसिलिया ब्लोमडाहल नॉर्वे येथील बर्फाळ बेट स्वालबार्ड येथे रहातात. त्यांनी सांगितले की येथे घराच्या बाहेर पडताना बंदूक जवळ बाळगावी लागते. त्याच नाहीत तर येथे बहुतांश लोक रायफल किंवा बंदूक जवळ सुरक्षेसाठी बाळगतात. याचे कारण म्हणजे येथे पोलर बिअर ( पांढरे अस्वल ) यांची संख्या मोठी आहे. ते कधीही अचानक तुमच्या समोर येऊ शकतात.

पांढऱ्या अस्वलांपासून संरक्षण

ब्लोमडाहल यांनी सांगितले की पोलर बिअरसाठी हत्यार बाळगणे गरजेचे असते.तरीही त्यांना नऊ वर्षात कधी रायफलचा वापर करण्याची वेळ आली नाही. परंतू जंगलात मोकळ्या जागी फिरताना रायफल वा फ्लेअर गन सोबत बाळगणे मजबूरी आहे. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की बंदूकीचा वापर केवल जीवाला धोका होण्याच्या स्थितीच केला जातो.

शहरात शस्रास्राचे कठोर नियम

स्वालबार्ड प्रशासनाच्या नियमांनुसार शहराच्या आत लोडेड बंदूक घेऊन फिरण्यास बंदी आहे. दुकानं आणि सार्वजनिक इमारतीत शस्र घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. बंदूक बाळगणे कायद्याने अनिवार्य नाही. परंतू धोक्यापासून वाचण्यासाठी हा सल्ला दिला जातो. बंदूक घेण्यासाठी गर्व्हनरच्या कार्यालयात अर्ज करावा लागतो आणि आवश्यक औपचारिकता पूर्ण करावी लागते.

जगातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक

स्वालबार्ड हे जगातील सर्वात सुरक्षित स्थानांपैकी एक आहे. येथे कायम स्वरपी घरे नाहीत आणि गुन्ह्याच्या घटना सामान्य नाहीत. या शहराची भौगोलिक स्थिती भूकंप आणि अन्य नैसर्गिक संकटात या शहरास सुरक्षित राखते. ही जाग केवळ सुंदर नसून सुरक्षा आणि अनोख्या जीवनशैलीचे देखील एक अदभूत उदाहरण मानले जाते.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.