Afghanistan Foreign Currency ban: तालिबानने अफगाणिस्तानात विदेशी चलनाच्या वापरावर घातली बंदी

ऑगस्टमध्ये तालिबानने देशाचा ताबा घेतल्यानंतर, बऱ्याच देशांनी आर्थिक मदत बंद केल्याने अफगाणिस्तानातची अर्थव्यवस्था आधिच संकटात आहे. आशा परिस्थितीत विदेशी चलनावर बंदी लावल्याने अफगाणिस्तानातची आर्थिक संकट अजून गंभीर होऊ शकते.

Afghanistan Foreign Currency ban: तालिबानने अफगाणिस्तानात विदेशी चलनाच्या वापरावर घातली बंदी
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 5:17 PM

तालिबानने अफगाणिस्तानात विदेशी चलनाच्या वापरावर (foreign currency ban) बंदी घातली आहे. ऑगस्टमध्ये तालिबानने देशाचा ताबा घेतल्यानंतर, बऱ्याच देशांनी आर्थिक मदत बंद केल्याने अफगाणिस्तानातची अर्थव्यवस्था आधिच संकटात आहे. आशा परिस्थितीत विदेशी चलनावर बंदी लावल्याने अफगाणिस्तानातची आर्थिक संकट अजून गंभीर होऊ शकते. “देशातील आर्थिक परिस्थिती आणि राष्ट्रीय हितासाठी सर्व अफगाणांनी प्रत्येक व्यवहारात अफगाणी चलन वापरणे आवश्यक आहे,” तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले. अफगाणिस्तामध्ये बहुतेक व्यवहार हे डॉलर्समध्ये होतात आणि पाकिस्तानच्या सिमेवरील शहरांमध्ये रूपयामध्ये व्यवहार होतात. (Taliban bans foreign currency in Afghanistan economy in trouble)

इस्लामिक अमिरातीत सर्व नागरिक, दुकानदार, व्यापारी आणि सामान्य जनतेला यापुढे सर्व व्यवहार अफगाणी चलनाने करण्याचे आणि परदेशी चलन वापरण्यास बंदी करण्याचे निर्देश देते,” तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले. या आदेशाचे कोणीही उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.

ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर, यूएस फेडरल रिझर्व्ह आणि युरोपमधील केंद्रीय बँकांनी देशाच्या अब्जावधी डॉलर्सची विदेशी मालमत्ता फ्रीज केली होती. देशातील आर्थिक परिस्थिती आणि राष्ट्रीय हितासाठी सर्व अफगाणांनी प्रत्येक व्यवहारात अफगाणी चलन वापरणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

भारत NSA बैठक घेणार

दरम्यान, अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी भारत NSA म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या स्तरावरील बैठकीचं आयोजन करणार आहे. ऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. अश्रफ गनी देश सोडून पळून गेले, आधीचं सरकार कोसळलं. त्यानंतर अख्ख्या जगाने अफगाणिस्तानला दिली जाणारी मदत थांबवली. त्यातच अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था आता पूर्णपणे मोडकळीस आली आहे.

Other News

कोरोनाचा डाग पुसण्यासाठी चीनच्या उलट्या बोंबा, आता म्हणतो, जगभरात कोरोना पसरवण्यासाठी हे 3 देश जबाबदार!

India vs Afghanistan T20 world cup 2021: विश्वचषकात पहिला विजय मिळवण्यासाठी विराटसेना सज्ज, अफगाणिस्तानशी लढत

अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारताकडून NSA स्तरावरील बैठकीचं आयोजन, पाकिस्तानने निमंत्रण नाकारलं, आता ‘हे’ देश होणार सहभागी!

Non Stop LIVE Update
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा...
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा....
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही.
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी.
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर...
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर....
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात..
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात...
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज.
आंदोलन होतं विशाळगडासाठी, टार्गेट झालं गजापूर, नेमका कोणी घातला धुडगूस
आंदोलन होतं विशाळगडासाठी, टार्गेट झालं गजापूर, नेमका कोणी घातला धुडगूस.
मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा, आंबेडकरांच्या भूमिकेवरही सवाल
मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा, आंबेडकरांच्या भूमिकेवरही सवाल.
बहिणीनंतर भाऊही लाडके...शिंदेंकडून नव्या योजना, कोण पात्र अन् अटी काय?
बहिणीनंतर भाऊही लाडके...शिंदेंकडून नव्या योजना, कोण पात्र अन् अटी काय?.
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.