मुस्लीम देशाल महिलांना बुरख्यात करावं लागलं असं काही, शिक्षण नाही पण असं सर्व…, जाणून व्हाल थक्क
अनेक मुस्लीम देशांमध्ये महिलांना अत्यंत खडतर आयुष्य जगावं लागत आहे. प्रकृती स्थिर नसल्यास त्यांना उपचाराचे देखील अधिकार नाहीत, कारण देखील महिला डॉरक्टांची संख्या लहान आहे. पण फक्त सुंदर दिसण्यासाठी येथील महिलांसाठी वेगळे नियम आहेत...

अनेक मुस्लीम देशांमध्ये महिलांसाठी कायदे आणि नियम अत्यंत कठोर आहेत. अशाच मुस्लीम देशांपैकी एक देश म्हणजे तालिबान… सांगायचं झालं तर, अफगाणिस्तानातील तालिबान राजवट मानवी हक्कांचे उल्लंघन आणि मूलभूत हक्कांच्या उल्लंघनासाठी जगभरात कुप्रसिद्ध आहे. पण येथे महिलांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अफगाणिस्तानमध्ये महिलांना जीम, पार्क किंवा कॉलेजमध्ये जाण्यास परवानगी नाही, पण त्यांना महिलांना फेसलिफ्ट आणि बोटॉक्स करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. महिला पूर्ण कपड्यांमध्ये असल्या पाहिजे… पण त्या सुंदर देखील दिसल्या पाहिजे… असा अफगाणिस्तानातील कायदा आहे…
ही प्रचंड विचित्र परिस्थिति आहे, कारण येथे महिला डॉक्टर होण्यासाठी शिक्षण घेवू शकत नाही आणि देखील पुरुष डॉक्टरांची संख्या अधिक आहे. अशात असा प्रश्न उपस्थित होतो की, महिलांनी बोटॉक्स कोण देत आहे? कारण या देशाच पुरुष डॉक्टर महिलांवर उपचार करु शकत नाहीत. तालिबान परदेशातील सौंदर्य तज्ज्ञांना बोलावत आहे…
याचं उत्तर खुद्द तालिबानकडे आहे… तालिबान तुर्कीये सारख्या देशांमधून कॉस्मेटिक तज्ज्ञांना अफगाणिस्तानात आणत आहेत. परदेशात प्रशिक्षण घेतलेले काही अफगाण डॉक्टर देखील परत येत आहेत आणि या क्षेत्रात काम करत आहेत. . याचा अर्थ असा होतो की, फेसलिफ्ट, केस प्रत्यारोपण आणि लिप फिलर हे जगातील सर्वात कडक इस्लामिक राजवटींमध्येही होत आहेत.
सौंदर्यासाठी काही नियम शिथिल…
महिला फक्त सुंदर दिसाव्यात यासाठी तालिबान स्वतःचे नियम शिथिल करत आहे, परंतु अलिकडच्या विनाशकारी भूकंपात शेकडो महिला ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या तेव्हा त्यांना कोणताहा पुरुष त्यांचे प्राण वाचवण्यासाठी पुढे आला नाही. एवढंच नाही तर, तालिबानच्या कठोर नियमांनुसार, येथे पत्नी नसेल तर दुसरा कोणत्या पुरुष महिलेला स्पर्श करु शकत नाही. याच नियमामुळे अनेक महिलांनी आपले प्राण गमावले. तालिबानची वाईट बाजू म्हणजे, महिला सुंदर असू शकतात, पण सुरक्षित नाहीत. त्यांना सजवलं जाऊ शकतं, पण सक्षम करता येत नाही. त्यांना आरशात पाहता येतं, पण संकटाच्या काळात दुर्लक्षित केलं जातं.
आधुनिक अफगाणिस्तानातील कटू सत्य
तालिबान राजवटीत, महिलांना अशा समाजात राहण्यास भाग पाडलं जातं जिथे त्यांचं सौंदर्य ‘राजकारणाचा भाग’ आहे. त्यांचे शरीर ‘नियंत्रित’ असतं आणि त्यांचं जीवन प्राधान्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असतं. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, आज अफगाणिस्तानात बोटॉक्स घेणे सुरक्षित आहे, परंतु भूकंपातून वाचणे सुरक्षित नाही.
