AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्रात मोठी दुर्घटना, चार बोटी बुडाल्या; 180 जण बेपत्ता

मोठी बातमी समोर आली आहे, मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चार बोटी समुद्रात बुडाल्या. या दुर्घटनेत तब्बल 180 लोक बेपत्ता झाले आहेत.

समुद्रात मोठी दुर्घटना, चार बोटी बुडाल्या; 180 जण बेपत्ता
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 07, 2025 | 7:03 PM
Share

मोठी बातमी समोर आली आहे, मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चार बोटी समुद्रात बुडाल्या. या दुर्घटनेत तब्बल 180 लोक बेपत्ता झाले आहेत. यमन आणि जिबूतीदरम्यान ही दुर्घटना घडली. संयुक्त राष्ट्र संघाकडून या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. ज्या समुद्री मार्गावर ही दुर्घटना घडली आहे, त्याचा समावेश हा जगातील सर्वात धोकादायक असलेल्या समुद्री मार्गांमध्ये होतो. या मार्गाने प्रमुख्यानं इथोपियन नागरिक रोजगाराच्या शोधात आखाती देशांमध्ये जातात. मात्र या मार्गावरून प्रवास करत असताना ही मोठी दुर्घटना घडली. या अपघातामध्ये चार बोटी समुद्रात बुडाल्या असून,180 लोक बेपत्ता झाले आहेत.

आयएमओने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. चार बोटी समुद्रात बुडाल्या आहेत. या चार बोटींमधून तब्बल 180 नागरिक प्रवास करत होते. या बोटी प्रवाशांनी खचाखच भरलेल्या होत्या. या चारही बोटी समुद्रात बुडल्या, यातून प्रवास करणारे सर्व प्रवाशी बेपत्ता झाले आहेत, त्यांचा अजूनही शोध लागला नसून घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. मात्र अजून यातील एकही प्रवाशी सापडलेला नाहीये. हा अपघात यमन आणि जिबूतीदरम्यान असलेल्या समुद्री मार्गावर घडला आहे. या मार्गावर आधी देखील काही दुर्घटना घडल्या आहेत. 2024 साली या मार्गानं एकूण 60,000 लोकांनी प्रवास केला, त्यातील 558 लोकांचा मृत्यू झाला.

यापूर्वी जानेवारी महिन्यात देखील या मार्गावर मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत बोट बुडाल्यानं 20 इथोपियन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता ही मोठी दुर्घटना घडली आहे. तब्बल 180 प्रवाशी बेपत्ता आहे.रोजगाराच्या शोधात हे लोक या खतरनाक रस्त्याने प्रवास करतात, अपघात झाल्यास अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे, बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे, मात्र अजून एकही प्रवाशी सापडेला नाहीये. या दुर्घटनेनंतर बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.  अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?