Thailand Cambodia Conflict : मंदिरावरुन दोन देशात युद्धाची स्थिती, F-16 मधून एअर स्ट्राइक, रॉकेट लॉन्चरने हल्ला, आतापर्यंत काय-काय घडलय?
Thailand Cambodia Conflict : या संघर्षात 9 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 40 हजार लोकांना घरामधून बाहेर काढून सुरक्षित स्थळी पाठवण्यात आलय. दोन्ही देशांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. दोन्ही देशांच सैन्य अलर्ट मोडवर आहे. तणाव कायम असून परिस्थिती कधीही बिघडू शकते.

थायलंड आणि कंबोडिया या दोन देशात तणाव खतरनाक वळणावर जाऊन पोहोचलाय. दोन्ही देशांचं सैन्य आमने-सामने आहे. गोळीबार आणि रॉकेट हल्ल्यात 9 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झालाय. आता एअर फोर्स मैदानात उतरली आहे. थायलंड आणि कंबोडियामध्ये सीमावादाने हिंसक वळण घेण्याची ही पहिली वेळ नाहीय. पण यावेळी प्रकरण अधिक गंभीर होताना दिसतय. दोन्ही देशांच सैन्य पूर्ण ताकदीने आमने-सामने आहे. कूटनितीऐवजी कारवाई, हल्ल्याने मार्ग शोधत आहेत. या संपूर्ण घटनाक्रमाची क्रोनोलॉजी समजून घेऊया.
थाई आर्मीच्या माहितीनुसार थायलंडच्या सुरिन प्रांत आणि कंबोडियाच्या ओडर मेंची प्रांताच्या सीमेवर मुएन थोम हे एक प्राचीन मंदिर आहे. या प्रदेशावरुन दोन्ही देशांमध्ये बऱ्याच वर्षांपासून वाद आहे. मंदिराचा मालकी कोणाकडे राहणार? यावरुन अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे.
पण ते मागे हटले नाहीत
थाई सैन्याच्या टेहळणी प्रणालीने सकाळी 7.30 वाजता मंदिराजवळ कंबोडियाने पाठवलेलं ड्रोन पाहिलं. हे ड्रोन काहीवेळ मंदिरावर घिरट्या घालत होतं. त्यानंतर गायब झालं. त्यानंतर लगेच सीमेला लागून असलेल्या कुंपणाजवळ सहासशस्त्र कंबोडियन सैनिक दिसले. ते या भागात दाखल होण्याचा प्रयत्न करत होते. थाई गार्ड्सनी त्यांना इशारा दिला. पण ते मागे हटले नाहीत.
अचानक गोळीबार सुरु
सकाळी 8.20 च्या सुमारास कंबोडियाई सैनिकांनी थाई मिलिट्री पोस्टवर अचानक गोळीबार सुरु केला. ही पोस्ट मुएन थोम मंदिराजवळ आहे. थाई सीमा पोलीस तिथे तैनात होते. फायरिंगमध्ये छोट्या शस्त्रांशिवाय मोर्टार आणि ग्रेनेड लॉन्चरचा वापर झाला. थाई सैनिकांनी लगेच प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरु केला.
BM-21 रॉकेट लॉन्चरने हल्ले
फक्त फायरिंगने गोष्ट थांबली नाही. 9.40 च्या सुमारास कंबोडियाकडून BM-21 रॉकेट लॉन्चरने हल्ले झाले. हे रॉकेट थायलंडच्या सिसाकोत प्रांतात निवासी भागात पडले. काही नागरिक जखमी झाले. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
तीन लोकांचा जागीच मृत्यू
त्यानंतर 15 मिनिटांनी सकाळी 9.55 च्या सुमारास कंबोडियाई सैनिकांनी सुरिन प्रांताच्या काप चोएंग भागाला टार्गेट केलं. एक रॉकेट थेट एकाघरावर पडलं. त्यात तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले.
सहा F-16 फायटर जेट्समधून हल्ला
वाढता तणाव पाहून थायलंडची एअरफोर्स मैदानात उतरली. सहा F-16 फायटर जेट्सनी कंबोडियाच्या आता दोन सैन्य ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात कंबोडियाच्या लॉजिस्टिक्स आणि रडार यूनिट्सच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा करण्यात येतोय.
