AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US ची खतरनाक डेल्टा फोर्स, जिने निकोलस मादुरो यांना राष्ट्रपतीभवनातून उचलून नेले

US Delta Force: अमेरिकन सैन्याच्या ज्या खतरनाक डेल्टा फोर्सने व्हेनेझुएलात हल्ला केला आणि तेथून राष्ट्राध्यक्ष निकोलन मादुरो आणि त्यांच्या पत्नीला उचलून नेले. या डेल्टा फोर्सची तुलना जगातील सर्वात खतरनाक युनिटमध्ये केली जाते. या डेल्टा टीमने अलकायदा आणि इस्लामिक स्टेटच्या अनेक टॉप कमांडरचा खात्मा केला आहे.

US ची खतरनाक डेल्टा फोर्स, जिने निकोलस मादुरो यांना राष्ट्रपतीभवनातून उचलून नेले
US Delta Force
| Updated on: Jan 03, 2026 | 7:37 PM
Share

व्हेनेझुएलाची राजधानी काराकासला हादरवल्यानंतर अमेरिकेच्या कमांडोंनी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केली आहे. अमेरिकेची स्पेशल टीम डेल्टा फोर्सने ही कारवाई केली आहे.व्हेनेझुएलात कोणाला काही समजण्याआधीच डेल्टा टीमने हे ऑपरेशन फत्ते केले आहे. एकीकडे अमेरिकने डेल्टा फोर्सच्या फायटर जेट्सने व्हेनेझुएलाच्या अनेक मिलिट्री बेसवर अचानक हल्ला केला. आणि दुसरीकडे सीक्रेट ऑपरेशन अंतर्गत मादुरो आणि त्यांची पत्नीला जेरबंद केले. हीच ती डेल्टा फोर्स आहे जिने खतरनाक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचे प्रमुख अबु बक्र अल बगदादी याची हत्या केली होती.

डेल्टा फोर्स आज देखील जगातील सर्वात रहस्यमयी आणि खतरनाक स्पेशल युनिट्समध्ये गणली जाते. या फोर्सची गुप्त माहिती पब्लिक डोमेनमध्ये नाही. डेल्टा फोर्स अमेरिकेन सशस्र सैन्यातील सर्वात गुप्त आणि हाय लेव्हलची स्पेशल युनिट मानली जाते. या वेगवेगळ्या वेळी कॉम्बॅक्ट एप्लिकेशन्स ग्रुप (CAG),  टास्क फोर्स ग्रीन, आर्मी कंपार्टमेंटेड एलिमेंट्स ( ACE ) आणि सामान्यपणे ‘द यूनिट’ देखील म्हटले जाते. याची ओळख आणि अस्तित्व अमेरिकेने कधीही औपचारिक स्वरुपात स्वीकारलेले नाही.जी काही माहिती सार्वजनिक आहे ती माजी सदस्यांच्या वक्तव्यांवर आधारित आहे.

डेल्टा फोर्सला टार्गेट कसे सोपवले जाते ?

डेल्टा फोर्सचे मुख्य फोकस एण्टी टेररिस्ट ऑपरेशन्स आहे. ज्यात हाय व्हॅल्यू टार्गेट्सना पकडणे वा समाप्त करणे आणि अतिरेकी नेटवर्क तोडणे यांचा समावेश आहे.हे युनिट्स केवळ काऊंटर रेररिझमपर्यंत मर्यादित नाही. यात छापेमारी, तोडफोड, ओलिसांना सोडवणे, विशेष निगराणी आणि गुप्त मोहिमांसारख्या अनेक प्रकारच्या मिशनचा समावेश आहे.हे युनिट्स जॉईंट स्पेशल ऑपरेशन कमांड्सच्या ऑपरेशनल कंट्रोलमध्ये काम करते. याचे प्रशासन आर्मी स्पेशल ऑपरेशन्स कमांड (USASOC) सांभाळते. याचे हेडक्वॉटर नॉर्थ कॅरोलिनाच्या फोर्ट ब्रॅगमध्ये आहे.

डेल्टा फोर्समध्ये 7 स्क्वॉड्रन

डेल्टा फोर्समध्ये सुमारे 2,000 सैनिक असतात, त्यात 300 ते 400 वॉर ऑपरेशनमध्ये सामील होतात. संघटनात्मक रुपात हा फोर्स सात स्क्वॉड्रन विभागली गेली आहे. 4 असॉल्ट स्क्वॉड्रन,1 एव्हीएशन स्क्वॉड्रन,1 क्लँडेस्टाईन स्क्वॉड्रन, 1 कॉम्बॅट सपोर्ट स्क्वॉड्रनचा समावेश आहे.प्रत्येक स्क्वॉड्रनला तीन ट्रुप्समध्ये विभागण्यात आले आहे. ज्यात दोन डायरेक्ट एक्शन मिशन करतात आणि तिसरा टेहळणी आणि स्नायपर ऑपरेशन्सवर फोकस करतात.

डेल्टा फोर्सची ऑपरेशन्स

अमेरिकेच्या या एलिट स्पेशल फोर्स डेल्टाने अनेक खतरनाक मोहिमा तडीस नेल्या आहेत. यातील अनेक मोहीमा गुप्त आहेत. परंतू काही मोहिमांची इतिहासात नोंद झाली आहे. काही खूपच यशस्वी झाल्या आहेत.तेहरान येथे अमेरिकन दुतावासाचा ताबा घेऊन बसलेल्या इराणी क्रांतीकारकांच्या तावडीतून ओलीसांची सुटका करणारे मिशन मात्र वादग्रस्त ठरले. यात आठ पैकी चार हेलिकॉप्टर बेकार झाली. चकमकीत आठ अमेरिकन सैनिक ठार झाले. काही अमेरिकन सैनिकांचे मृतदेह इराणच्या हाती सापडले. ते टीव्हीवर दाखवण्यात आले. या अपयशानंतर अखेर अमेरिकेने विशेष मोहिमांसाठी 160वी स्पेशल ऑपरेशन्स एव्हीएशन रेजिमेंट तयार केली.

त्यानंतर अनेक मोहिमा यशस्वी झाल्या. 1989 मध्ये पनामावरील अमेरिकन हल्ल्यादरम्यान राबवलेल्या ऑपरेशन अ‍ॅसिड गॅम्बिट अंतर्गत डेल्टा कमांडोने कुप्रसिद्ध मॉडेलो तुरुंगातून ओलिस कर्ट मुइस याची सुटका केली. आखाती देशात या युनिट्सने इराकी सैन्याला चकवा दिला. नकली सैन्य कारवाई केली आणि युद्धाच्या अंतिम दिनी इस्रायलवर डागल्या जाणाऱ्या 26 स्कड मिसाईलना नष्ट केले.

 ISIS प्रमुख अबू बक्र अल-बगदादी याला पकडले

9/11 नंतर डेल्टा फोर्सने अफगाणिस्तान आणि इराकमध्ये अल-कायदा आणि तालिबान टॉप कमांडर्स विरोधात ऑपरेशन चालवले. साल 2012 मध्ये लिबियाच्या बेनगाझी हल्ल्या दरम्यान अमेरिकन दुतावासातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युनिट एक्टीव्ह राहिली. ऑक्टोबर 2019 मध्ये डेल्टा फोर्सने ऑपरेशन कायला म्यूलर राबवले. त्यात ISIS प्रमुख अबू बक्र अल-बगदादी याला पकडले. मोहिमेदरम्यान बगदादीने आत्मघाती जॅकेटचा स्फोट करुन स्वत:ला आणि स्वत:च्या दोन मुलांना ठार केले.

BMC Election | महानगरपालिका निवडणुकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा
BMC Election | महानगरपालिका निवडणुकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा.
Devendra Fadnavis | सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे
Devendra Fadnavis | सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
Shambhuraj Desai | शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होणं अशक्य
Shambhuraj Desai | शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होणं अशक्य.
उद्धवमामूंचा महापौर झाला तर...; अमित साटम यांचा ठाकरेंना टोला
उद्धवमामूंचा महापौर झाला तर...; अमित साटम यांचा ठाकरेंना टोला.
बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट घेताना अमित ठाकरे झाले भावूक
बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट घेताना अमित ठाकरे झाले भावूक.
ठाण्यात उमेदवारांना दमदाटी! अविनाश जाधवांचा गंभीर आरोप
ठाण्यात उमेदवारांना दमदाटी! अविनाश जाधवांचा गंभीर आरोप.
Jalgaon| कडाक्याच्या थंडीमुळे केळीच्या उत्पादनाला करपा रोगाने घेरलं
Jalgaon| कडाक्याच्या थंडीमुळे केळीच्या उत्पादनाला करपा रोगाने घेरलं.
गॉगल लावत, कॉलर उडवली अन् उदयनराजे गाण्यावर थिरकले | VIDEO
गॉगल लावत, कॉलर उडवली अन् उदयनराजे गाण्यावर थिरकले | VIDEO.
मुंबईसाठी प्रकाशित केलेल्या ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात नेमकं काय?
मुंबईसाठी प्रकाशित केलेल्या ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात नेमकं काय?.
चंद्रपूरनंतर अमरावतीत फडणवीसांचा रोड शो; भाजप नेत्यांचा सहभाग
चंद्रपूरनंतर अमरावतीत फडणवीसांचा रोड शो; भाजप नेत्यांचा सहभाग.