AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भूकंपाने आक्रित घडले, समुद्रातून जमीनच बाहेर आली,या बेटाचा नकाशाच बदलला…

8 जून 2026 रोजी मिंडानाव्हो येथे आलेल्या 7.8 तीव्रतेच्या भूकंपाने सारंगानी बेटातून समुद्रातील जमीन बाहेर आल्याने तेथील रहिवासी प्रचंड घाबरले आहेत. ज्या नौका समुद्रात तंरगत होत्या त्यांच्या खाली अचानक जमीन आली...

भूकंपाने आक्रित घडले, समुद्रातून जमीनच बाहेर आली,या बेटाचा नकाशाच बदलला...
Sarangani Betachi, Mindanao
| Updated on: Jun 19, 2026 | 11:40 PM
Share

8 जून 2026 रोजी फिलिपाईन्स येथील मिंडानावो येथील सारंगानी बेटांच्या दक्षिणेत समुद्राच्या आता आलेल्या 7.8 तीव्रतेच्या शक्तीशाली भूकंपाने जमीनीला असे हादरवले की येथील भूगोलच बदलून टाकला आहे. या भूकंपानंतर सारंगानी आणि आजूबाजूच्या किनाऱ्याचा धक्कादायक कायापालट झाला आहे. समुद्राचे पाणी अचानक मागे गेले आणि जो भाग आधी समुद्राच्या पाण्याच्या खाली होता. आता आता कोरड्या जमीनीच्या रुपातवर आला आहे.

वैज्ञानिक भाषेत याला कोस्टल अपलिफ्ट म्हटले जाते. सरकारी संशोधक या बदलाच्या मागील भूगर्भीय कारणांना समजण्यासाठी एकत्र झाले आहेत, मात्र सोशल मीडियावर काही अफवा पसरल्याने स्थानिक लोक दहशतीखाली आहेत.

समुद्राचा किनारा मागे सरकण्यामागे आणि जमीन पुन्हा वर येण्याच्या या घटनेने किनारपट्टीवर राहाणाऱ्या लोकांच्या मनात आता एकच प्रश्न निर्माण होत आहे की समुद्राचे मागे सरकलेले पाणी पुन्हा सुनामी म्हणून येणार का ?

सर्वसाधारणपणे सुनामी येण्याच्या आधी समुद्राचे पाणी अचानक वेगाने मागे सरकले जाते, त्यामुळे लोकांना भिती वाटणे स्वाभाविक आहे. परंतू संशोधकांनी या घटनेनंतर सुनामीचे कोणतेही संकेत नाही. हा पृथ्वीच्या पोटातील टेक्टोनिक प्लेटमधील हालचालीचा कायमस्वरुपी परिणाम आहे.

हा सर्व ‘थ्रस्ट फॉल्ट’चा खेळ ?

पृथ्वीच्या वरली कवच वा क्रस्ट संपूर्ण एक तुकडा नाही, तर अनेक मोठ्या आणि छोट्या प्लेट्सने मिळून तयार झालेला असल्याने त्याला ‘टेक्टोनिक प्लेट्स’म्हटले जाते. प्लेट टेक्टोनिक सिद्धांतानुसार या प्लेटच्या आत अनेक फटी आहेत. त्यांना वैज्ञानिक भाषेत ‘फॉल्ट’ म्हटले जाते.

जेव्हा हे खडकाळ ब्लॉक परस्पर एक मेकांच्या विरोधात हालचाल करतात ,तेव्हा मुख्य रुपाने तीन प्रकारचे फॉल्ट तयार होतात. पहिला असतो ‘स्ट्राईक-स्लिप फॉल्ट’ ज्यात खडक हॉरिझॉन्टल रुपात एक मेकांना रगडून पुढे जातात. दुसरा ‘नॉर्मल फॉल्ट’ असतो, ज्यात एक झुकलेल्या दरीत वरचा खडकाळ भाग खालच्या दिशेने खचला जातो.

परंतू सारंगानी येथे आलेला भूकंप तिसरा आणि सर्वात शक्तीशाली प्रकारच्या फॉल्टमुळे झाला आहे. ज्यास ‘थ्रस्ट फॉल्ट’ वा ‘रिव्हर्स फॉल्ट’म्हटले जाते.यात जेव्हा दोन्ही खडकाळ ब्लॉक आपआपसात धडकतात. तेव्हा झुकलेली दरीच्या वरचा खडकाळ भाग खालच्या भागाच्या वरती चढतो. म्हणजे तो वरच्या दिशेने ढकलला जातो.

स्थायी कोस्टल अपलिफ्ट

सारंगानी आणि जोस अबाद सँटोसच्या किनाऱ्यावर जे झाले ते सुनामीचे पाणी मागे हटणे नव्हते. तर स्थायी कोस्टल अपलिफ्ट होते. येथे वास्तवात समुद्राचे पाणी मागे गेले नव्हते, मात्र, ज्या जमीनीवर समुद्राचे पाणी साचले होते, ती जमीनच भूकंपाच्या झटक्याने वर उचलली गेली आहे.जमीन आता समुद्राच्या पातळीपेक्षा वर उचलली गेल्याने समुद्राचे पाणी उताराच्या दिशेने सरकले गेले आहे.

सुनामी येण्याची भीती बाळगू नये

त्यामुळे हे संपूर्णपणे जमीन समुद्राच्यावर येण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे स्थानिकांनी सुनामी येण्याची भीती बाळगू नये. जोपर्यंत नवा भूकंप येत नाही आणि समुद्राच्या केंद्रात लाटा उसळत नाही तोपर्यंत २०० मीटरची ही नवीन जमीन कोरडीच राहिल असे संशोधकांनी म्हटले आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?