AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganpati photo on Note : जगातील एकमेव देश जेथे नोटेवर आहे गणपती बाप्पाचा फोटो

lord ganesha on currency note : जगातील हा एकमेव देश आहे ज्या देशात नोटेवर गणपतीचा फोटो आहे. भारतात सर्वाधिक हिंदू लोकं राहतात. जगभरात गणपतीची उपासना करणारे लोकं आहेत. गणेशोत्सव तर आता विविध देशांमध्ये साजरा होतो. पण कोणत्या देशात नोटेवर गणपती आहे जाणून घ्या.

Ganpati photo on Note : जगातील एकमेव देश जेथे नोटेवर आहे गणपती बाप्पाचा फोटो
| Updated on: Sep 21, 2023 | 8:44 PM
Share

Ganpati Photo on currency note : भारतात देवी-देवतांना खूप महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मात सर्वात प्रथम गणपती बाप्पाचीच पूजा केली जाते. सध्या देशात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. सगळीकडे गणरायाचं आगमन झाले आहे. जगभरात गणरायाची उपासना करणारे लाखो लोकं आहेत. भारतातच नव्हे तर जगभरात गणपती बाप्पाची पूजा केली जाते. पण तुम्हाला माहित आहे का एका देशात नोटेवर गपणती बाप्पाचा फोटो आहे. खूप कमी लोकांना याबाबत माहिती आहे. कोणता आहे तो देश चला तर मग जाणून घेऊया.

तुम्ही कधी नोटांवर छापलेले गणपती बाप्पाचे चित्र पाहिले आहे का? कदाचित खूप कमी लोकांनी पाहिलं नसेल, पण जगात असा एक देश आहे जिथे नोटांवर गणरायाचं चित्र आहे. महत्त्वाचं म्हणजे या देशात सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या आहे. पण असे असतानाही येथे नोटेवर गणेशाचे चित्र आहे.

नोटांवर गणपतीचे चित्र

जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात नोटांवर गणपती छापला जातो. इंडोनेशियन सरकारने 1998 मध्ये ही नोट जारी केली होती. भारतातील चलनाप्रमाणे येथील चलनही प्रचलित आहे. येथील चलनाला रुपिया असे म्हटले जाते. इंडोनेशियातील सुमारे ८७.५ टक्के लोक इस्लामला मानणारे लोकं आहेत. तर फक्त ३ टक्के हिंदू लोकं येथे राहतात. इंडोनेशियामध्ये 20 हजार रुपयांच्या नोटेवर गणपतीचे चित्र आहे.

इंडोनेशियामध्ये 20 हजार रुपयांच्या नोटेवर समोरच्या बाजूला गणपतीचे चित्र आहे. तर मागच्या बाजुला एका वर्गाचे चित्र आहे, ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दिसत आहेत. नोटेवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवंत्रा यांचे चित्र आहे. देवंत्रा हे इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याचे नायक राहिले आहेत. इंडोनेशियामध्ये श्रीगणेशाला शिक्षण, कला आणि विज्ञानाची देवता मानले जाते. श्रीगणेशामुळेच तिथली अर्थव्यवस्था मजबूत आहे, असे तिथले लोक मानतात. मात्र, आता ही नोट इंडोनेशियामध्ये चलनात नाही.

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.