जगभरातून मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव, पाकिस्तानने शुभेच्छा तर दिल्या नाही, पण का दिल्या नाहीत, याचा असा केला खुलासा

Pakistan on Modi : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतात एनडीएचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येत आहे. मोदींवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मोठं-मोठ्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पण पाकिस्तानच्या तोंडातून अद्याप एक शब्दही फुटलेला नाही.

जगभरातून मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव, पाकिस्तानने शुभेच्छा तर दिल्या नाही, पण का दिल्या नाहीत, याचा असा केला खुलासा
शुभेच्छा का नाही दिल्या, याचा केला खुलासा
Follow us
| Updated on: Jun 08, 2024 | 3:49 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दिल्लीत एनडीएचे सरकार येईल. भाजप नेतृत्वातील एनडीएने लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवले आहे. जगभरातून नरेंद्र मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण भारताचा शेजारी पाकिस्तान गपगुमान आहे. तिथल्या मीडियाने मोदींच्या विजयाचे विश्लेषण केले आहे. पण सरकारला या विजयाबाबत बोलायला, मोदींना शुभेच्छा द्यायला काही फुरसत नाही. पण शुभेच्छा का दिल्या नाहीत, याचा खुलासा मात्र पाकिस्तानने केला आहे.

परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य

पाकिस्तानने अद्याप मोदींना कोणत्याच शुभेच्छा दिल्या नाहीत. जगभरातील दिग्गज नेत्यांनी मोदींचे अभिनंदन केले. त्यांना फोनवरुन शुभेच्छा दिल्या. याविषयीची चर्चा स्थानिक माध्यमांनी मोठ्या प्रमाणात केल्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री मुमताज जहरा बलोच यांनी एक वक्तव्य दिले आहे. भारताच्या लोकांना नेता निवडीचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी नेता निवडावा जो त्यांचे सरकार योग्यरित्या चालवू शकेल.

हे सुद्धा वाचा

मोदी सरकारचा शपथविधी

9 जून रोजी मोदी सरकारचा शपथविधी होईल. एनडीएने लोकसभेत 293 जागा मिळवल्या आहेत. त्यांना बहुमत मिळाले आहे. या सोहळ्यासाठी शेजारील देशातील नेत्यांना पण आमंत्रित करण्यात आले आहे. अर्थात या यादीत पाकिस्तानचे नाव नाही. बांगलादेश, भुतान, श्रीलंका, सेशेल्स, नेपाळ येथील नेते सोहळ्याला उपस्थित असतील. बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना दिल्लीत पोहचल्या आहेत.

शुभेच्छा देण्यात कंजुषी का?

परराष्ट्रमंत्री मुमताज बलोच यांनी भारतीय पंतप्रधानांना अद्याप शुभेच्छा न देण्याचे कारण स्पष्ट केले. भारतीय निवडणूक प्रक्रियेवर पाकिस्तान कोणतीच टिप्पणी करु इच्छित नसल्याचे त्या म्हणाल्या. अजूनपर्यंत नवीन सरकारने शपथ घेतलेली नाही. त्यामुळे या सरकारला आम्ही अभिनंदनाचा संदेश पाठवले नसल्याचे कारण त्यांनी पुढे केले. पाकिस्तान शेजाऱ्यांसोबत सहकार्य आणि शांततेचे धोरण ठेवू इच्छितो. चर्चेतूनच सर्व अडचणी आणि प्रश्नावर तोडगा निघू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. मोदी सरकारच्या काळात पाकिस्तानविषयीच्या धोरणात अमुलाग्र बदल झाला आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर दोन्ही देशांचे संबंध ताणल्या गेले आहेत. गेल्या दहा वर्षांत दोन्ही देशातील नात्यात चढउतार दिसून आला.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.