AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा निकोलस औजुला आहे तरी कोण? त्याच्या त्या भाकि‍ताने जगाची का उडाली झोप?

Nicolas Aujla World War III : रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा युद्ध भडकण्याची दाट शक्यता आहे. त्याचे लोण जर युरोपपर्यंत पोहचले. तर पुढे जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असेल. त्यातच लंडनचे हिप्नोथेरपिस्ट निकोलस औजुला यांच्या भाकिताने सर्वांची झोप उडवली आहे.

हा निकोलस औजुला आहे तरी कोण? त्याच्या त्या भाकि‍ताने जगाची का उडाली झोप?
निकोलस औजुलाचे ते भाकीतImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 03, 2025 | 4:08 PM
Share

युक्रेनच्या ताज्या हल्ल्याने रशियाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही देशात मोठे युद्ध भडकण्याची शक्यता आहे. त्यातचे युद्धाचे लोण जर युरोपपर्यंत पोहचले. तर पुढे जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असेल. तर दुसरीकडे लंडन येथील हिप्नोथेरपिस्ट निकोलस औजुला यांच्या भाकिताने सर्वांची झोप उडवली आहे. त्याने यापूर्वी केलेल्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्यामुळे सर्वांचे लक्ष त्याच्या भाकिताकडे लागले आहे.

यावर्षासाठी मोठी भविष्यवाणी

वर्ष 2025 साठी निकोलसने मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याच्या या भाकिताने जगात हडकंप उठला आहे. अर्थात या भाकिताला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. निकोलसचा दावा आहे की, मनाच्या ताकदीने, शक्तीने त्याला या गोष्टींची, घटनांची अगोदरच जाणीव होते. त्याला त्या गोष्टी दिसतात. या तर्काला अर्थातच कुठलाही शास्त्रीय आधार नाही.

त्याने दावा केला आहे की, 2025 मध्ये तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता आहे. ब्रिटेन पण या तिसऱ्या महायुद्धात ओढल्या जाईल असा त्याचा दावा आहे. मॉस्कोमध्ये लेफ्टनंट जनरल यारोस्लाव मोस्कालिव याच्या कारमध्ये मोठा धमाका झाला. त्याचा आरोप क्रेमलिन, अर्थात रशियाने युक्रेनवर केला आहे. तर दुसरीकडे रशियातील काही नागरिकांनी या मागे ग्रेट ब्रिटेनचा हात असल्याचे म्हटले आहे. ब्रिटिश गुप्तहेर संघटनेने या हल्ल्यासाठी स्फोटकं पुरवल्याचा दावा करण्यात येत आहे. तर याचा बदला घेण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे निकोलसच्या भविष्यवाणीविषयी सर्वच जण चिंतेत आहेत.

मानवतेला काळीमा

निकोलसने असे भाकीत केले आहे की, मानवतेला काळीमा फासण्याच्या घटना 2025 च्या मधात होतील. सध्या जशा भू राजकीय तणावाच्या घटना घडत आहे, ते पाहता त्याच्या दाव्याविषयी अनेक जण भीती बाळगून आहे. युक्रेनने रशियावर ज्या प्रकारे हल्ले चढवले आहे. ते पाहता रशिया आता अधिक आक्रमक हल्ले करण्याची शक्यता आहे. यासोबतच निकोलसने या वर्षभरात अनेक नैसर्गिक संकटं मानव जातीवर येतील. त्यात अनेकांचा मृत्यू ओढावेल. काही देशांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल असा दावा करण्यात आला आहे.

डिस्क्लेमर : ही उपलब्ध स्त्रोतावरील माहिती आहे. टीव्ही 9 मराठी याविषयीचा कोणताही अधिकृत दुजोरा देत नाही.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.