AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला ताकही फूंकुन प्यावे लागणार, पहलगाम हल्ल्यामागे भयंकर मोठी चाल, खरा शत्रू तर .

डबघाईला आलेल्या पाकिस्तानाने आता ऐपत नसतानाही अवाढव्य ताकद असलेल्या भारताला का उकसवलं याचं इंगित आता बाहेर आलं आहे....

भारताला ताकही फूंकुन प्यावे लागणार, पहलगाम हल्ल्यामागे भयंकर मोठी चाल, खरा शत्रू तर .
| Updated on: Apr 30, 2025 | 5:38 PM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने स्ट्रॅटजिक पावले उचलली हेच योग्य आहे. कारण जर थेट हल्ला केला असता तर पाकिस्तानलाही तेच हवे होते. कारण भारताने आततायी होऊन हल्ला करावा हाच पहलगाम हल्लामागचा हेतू होता असे आता स्ट्रॅटजिक एक्सपर्ट बोलत आहेत. काय आहे या पहलगाम हल्ल्यामागचा हेतू ?  काय म्हणतायत एक्सपर्ट पाहा…

पाकिस्तान आपल्या भारताशी कधीही युद्ध न करता कायम ‘प्रॉक्सी वॉर’ या तंत्राचा वापर करत आला आहे. त्यासाठी मुस्लीम बहुल कश्मीराचा पाकिस्तान नेहमीच ढाल म्हणून वापर करीत आला आहे. काश्मिरला आता काही दिवसातच देशाच्या उर्वरित भागाशी  रेल्वेने जोडले जात असतानाच नेमका पहलगामवर हल्ला झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानशी भारताने थेट युद्ध सुरु न करता केवळ दबाव निर्माण केल्याने पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे.

आपण पाकिस्तान मिळणारे सिंधुनदीचे ६० टक्के पाणी अडवून पाकिस्तानचे नाक बंद करुन त्यांना बुक्क्यांचा मारा सुरु केला आहे. पाकिस्तानने कितीही आव आणला तरी भारतीय सैन्याच्या अचाट ताकद आणि  जिद्दीपुढे पाकचे सैन्य नाकाम आहे,  हे आजवरच्या चार युद्धाने तोंड फोडून घेतलेल्या पाकिस्तानला पक्के ठावूक आहे. पाकिस्तानने मुद्दामहून चिनाब रेल्वे पुलाच्या उद्घाटनाच्या तोंडावरच हा हल्ला केला आहे. कारण एकदा का काश्मीर उर्वरित देशाशी रेल्वेने जोडले की काश्मीरचा विकास वेगाने सुरु होणार आहे आणि नेमके हेच पाकिस्तानला नको आहे.

पाकिस्तानचे धंदे  थंड पडणार

काश्मीरातील बेकार तरुणांना धर्माच्या नावाने भडकावयचे पाकिस्तानचे धंदे मग थंड पडणार आहेत. नंतर पाकिस्तानच्या उन्मादी जनतेला, तेथील बेकार तरुणांपुढे कोणताही विकास कार्यक्रम देताना पाकिस्तानची मोठी अडचण आहे. त्यामुळे  हा देश १०० टक्के कोलमडून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच अस्थिरता आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या या फाटक्या देशाने सार्वभौम ताकदवान अशा भारताच्या गंडस्थळावर हल्ला करण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे.

आजवर पाकिस्तान अमेरिकेने फेकलेल्या तुकड्यांवर जगत होता. आजवर पाकिस्तानचा काश्मिरमधील इश्यू जीवंत आणि धगधगत ठेवण्यातच अमेरिका, रशिया, चीन या मोठ्या देशांचे हित गुंतलेले होते. आताही पाकिस्तानने त्याच्या हद्दीतील  पीओकेची जमीन चीनला आंदण दिली आहे. ही भूमी भारतावर कायम स्वरुपी चीनचा दबाव टाकण्यासाठीच पाकिस्तानने दिलेली आहे. ‘द प्रिंट’ मध्ये स्ट्रॅटजिक एक्सपर्ट स्वाती राव यांनी एक लेख लिहीला आहे. त्यात त्यांनी या हल्लामागे एक आंतरराष्ट्रीय कारस्थान असल्याचे म्हटले आहे.

भारतीय सैन्य पाकिस्तानला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची तयारी करीत आहे. पण त्याआधीच भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यास हळूहळु सुरुवात केली आहे. सिंधु करार सस्पेंड करणे, व्हीसा बंदी, अटारी बॉर्डर बंद करणे आधी उपाय भारताने योजून पाकिस्तानची हवा टाईट करुन टाकली आहे. पण पाकिस्तान कोणाच्या जीवावर उडी मारतो हे जाहीर आहे..

कोणाच्या जीवावर उड्या ?

पाकिस्तानच्या वायू सेनेने अलिकडेच चीनशी करार करुन आपली विमान ताफ्याची क्षमता वाढविली आहे. चीन आणि तुर्कीने पाकिस्तानला मोठी शस्रास्रांची मदत केली आहे. शी ज‍िनपिंगचा देश चीन पाकिस्तानला लागोपाठ शस्रास्र पुरवित आला आहे. तुर्कस्थान हा इस्लामी देश वेगाने पाचव्या पिढीचे स्टील्थ ( रडारवर अजिबात न दिसणारे ) फायटर जेट विमान विकसित करीत आहे. चीनने या आधीच अशी स्टील्थ विमाने विकसित केली असून ती पाकिस्तानला दिलेली आहेत.

भारताकडे मात्र सध्याच्या घडीला पाचव्या पिढीचे स्टील्थ विमान नाही. भारताची वायू सेना विमानाच्या टंचाईने त्रस्त आहे. पाकिस्तानने  या बदल्यात भारताला अडचण होईल असे स्ट्रॅटेजिक लाभाचे ‘शक्सगाम खोरे’ अनेक दशकांपूर्वीच चीनला आंदण दिले आहे. त्यामुळे बीजिंगला भारतावर अतिरिक्त दबाव गट तयार करण्याची आयती संधी मिळालेली आहे.

या नव्या इस्लामिक ताकदीची पाकला खिरापत

चीनच्या शस्रास्रांच्या क्वालिटीवर नेहमीच संशय असला तरी चीनने स्टील्थ विमानाचे तंत्रज्ञान चोरुन लपून तयार करण्यात यश मिळवलेले आहे ही बाब नाकारता येणार नाही. फायटर जेट एफसी-२१ ला अनेक एक्सपर्ट्सने बेकार आणि तकलादू ठरवले आहे. तसेच २०२१ मध्येच चीनने पाकिस्तानला मोठ्या डीस्काऊंटने पानबुड्या दिल्या आहेत. त्यातील बहुतांशी ऑपरेशनल स्टँडर्डवर कुचकामी ठरल्या आहेत. परंतू भारताला खरी चिंता तुर्कीची आहे. तुर्कीने ‘आशिया एन्यू इनिशिएटिव्ह’ चे अंतर्गत इस्लामच्या नावाखाली भारताच्या शेजारील इस्लामिक देशांशी संबंध मजबूत करायला सुरुवात केली आहे. तुर्कस्तानने पाकिस्तानला अनेक शस्त्रे दिली आहेत, त्याला  एक प्रकारचा इस्मामिक टच असतो आणि जिहादाची फोडणी दिलेली असते..त्यामुळे एक नाकाम आणि दिवाळखोर राष्ट्र असलेला पाकिस्तान चीन आणि तुर्कीच्या जीवावर उड्या मारत आहे.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.