मोठी बातमी! या बलाढ्य देशानं अमेरिकेचं टेन्शन वाढवलं, बनवला सीक्रेट बेस, अणू क्षेपणास्त्रं अन् लाँचर्सही तयार
जगभरात सध्या तणावाचं वातावरण आहे, युद्धाची परिस्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेचं टेन्शन वाढवणारी बातमी आता समोर आली आहे.

सध्या जगभरात तणावाचं वातावरण आहे, याच पार्श्वभूमीवर आता उत्तर कोरियानं मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर कोरियानं एक सीक्रेट बेस तयार केला आहे. अमेरिकी थिंक टँकच्या मते किम जोंग ऊन च्या सरकारने या गुप्त तळावर 9 अणू क्षेपणास्त्रं आणि त्यांचे लाँचर्स तयार ठेवले आहेत. जिथून आपत्कालीन परिस्थितीत शत्रू देशांवर हल्ला केला जाऊ शकतो. सिनपुंग-डोंग असं या गुप्त तळाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर कोरियाचं हे गुप्त तळ चीन पासून अवघ्या 27 किलोमीटर दूर अतंरावर आहे. मात्र आपल्या या नव्या तळावर उत्तर कोरियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. स्टॉकहोम इंटरनॅशनलच्या दाव्यानुसार वर्तमान स्थितीमध्ये सध्या उत्तर कोरियाकडे 50 अण्वस्त्र आहेत, जे जगभरात मोठा विध्वंस घडून आणू शकतात.
उत्तर कोरियाचा हा सीक्रेट बेस नॉर्थ प्योंगयांगमध्ये आहे, जिथे उत्तर कोरियाने हा बेस बनवला आहे, ती जागा चीनपासून अवघ्या 27 किलोमीटर दूर आहे. तर अमेरिकेपासून या बेसचं अतंर सात हजार किलोमीटर आहे. अमेरिकेचे मित्र राष्ट्र असेले दोन्ही देश जपान आणि दक्षिण कोरियाची सीमा या बेसपासून अवघ्या 100 किलोमीटर अंतरावर आहे.
अमेरिकन थिंक टँकच्या मते उत्तर कोरियाचा हा नवा बेस प्रचंड मोठा आहे, इथे एकाचवेळी 15 मिसाईल ठेवल्या जाऊ शकतात. मात्र यावर अजूनही उत्तर कोरियाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये. सीएनएनने दिलेल्या एका रिपोर्टनुसार 2014 सालीच या बेसच्या निर्मितीला सुरुवात झाली होती.22 किलोमीटर वर्ग जागेवर या बेसची निर्मिती करण्यात आली आहे.
सुरक्षा तज्ज्ञांच्या मते हा बेस यासाठी बनवण्यात आला आहे की, या बेसवर अमेरिका कधीच हल्ला करू शकणार नाही, कारण हा बेस चीनच्या जवळ आहे, जर हल्ला झाला तर अशा परिस्थितीमध्ये चीन देखील या युद्धात उडी घेऊ शकतो. तसेच या बेसमुळे अमेरिकेचे मित्र राष्ट्र देखील उत्तर कोरियांच्या टप्प्यात आले आहेत, त्यामुळे आता तणाव वाढण्याची शक्यत आहे.
