AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत नोकरीचं स्वप्न बघणाऱ्यांना ट्रम्प यांचा झटका, H-1B visa सह इतर व्हिसाबाबत मोठा निर्णय

अमेरिकेत नोकरीसाठी लागणारा H-1B visa आणि इतर व्हिसावरील बंधनं वाढवण्यात आली आहेत

अमेरिकेत नोकरीचं स्वप्न बघणाऱ्यांना ट्रम्प यांचा झटका, H-1B visa सह इतर व्हिसाबाबत मोठा निर्णय
| Updated on: Jan 01, 2021 | 3:36 PM
Share

वॉशिंग्टन : अमेरिकेत नोकरी करण्याचं (Jobs in the US) आणि तिथं स्थायिक होण्याचं स्वप्न बघणाऱ्यांना (Green Card Holder) अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा झटका दिला आहे. कारण, अमेरिकेत नोकरीसाठी लागणारा H1B visa किंवा कायमस्वरुपी रहिवासी होण्याच्या व्हिसावरील बंधनं 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहेत. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचं अमेरिकेतल्या कोर्टाकडूनही समर्थन करण्यात आलं आहे. त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला अधिक मजबूती मिळाली आहे.  (Trump extends freeze on H-1B, other work visas until March 31)

संघीय कोर्टानं ट्रम्प यांचं समर्थन कसं केलं?

अमेरिकेतील संघीय कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला समर्थन दिलं आहे. कोर्टाच्या मते, जगभरातून अमेरिकेत दरवर्षी लाखो लोक येतात. हजारो लोक इथल्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी येतात, आणि इथेच थांबतात. त्याचा भार अमेरिकेच्या सरकारवर येतो. त्यातच कोरोनाच्या संकटात अशा अप्रवासी नागरिकांना आरोग्य सुविधाही द्याव्या लागतात. त्याचा ताण आरोग्य व्यवस्थेवर येतो. त्यामुळे आरोग्य विमा असल्याशिवाय इतर देशातील अप्रवासी नागरिकांना अमेरिकेत प्रवेश दिला जाऊ नये असा आदेश कोर्टान दिला आहे.

या निर्णयानं भारतीयांवर काय परिणाम होणार?

अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे. आयटी क्षेत्रातील बहुतांश तरुण अमेरिकेत नोकरीसाठी जात असतात. आयटी कंपन्याच त्यांना यासाठी लागणारा व्हिसा काढून देतात. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना संकटात 22 एप्रिल आणि 22 जूनला H- 1B visa सह इतर व्हिसांवरही बंधनं घातली. त्यामुळं भारतातून अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्या हजारो भारतीय तरुणांना फटका बसला. कोरोनाचं संकट आता कमी झालं आहे, अमेरिकेत लसीकरणही सुरु आहे, त्यातच 31 डिसेंबरला या बंधनांची मुदत संपत होती, त्यामुळं तरुणांना पुन्हा हा व्हिसा मिळण्याची आशा होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं हजारो तरुणांना फटका बसला आहे.

नवे राष्ट्रपती जो बायडन हा निर्णय बदलणार?

अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक निर्णय बदलण्याचं आश्वासन आपल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दिलं होतं. बायडन सत्तेत आल्यानंतर हे निर्णय बदलाचं सत्रही सुरु होईल. मात्र, त्याआधी आपल्या कार्यकाळात मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प अनेक प्रभावी निर्णय घेत आहेत. जे निर्णय अमेरिका फर्स्ट अशा विचारसरणीच्या नागरिकांसाठी महत्त्वाचे आहेत. असे निर्णय बदलणं बायडन यांनाही शक्य होणार नाही. व्हिसाचा निर्णय त्यापैकीच एक मानला जातो आहे. त्यातच आता कोर्टानंही ट्रम्प यांचं समर्थन केल्यानं बायडन यांच्यापुढील आव्हानं वाढली आहेत.

संबंधित बातम्या:

अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी LIVE शोमध्ये घेतली कोरोना लस, सर्वांना लस घेण्याचे आवाहन

बांगलादेश सरकारचा मोठा निर्णय, भारतासाठी सर्वाधिक फायदेशीर

 

(Trump extends freeze on H-1B, other work visas until March 31)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.