अमेरिकी तज्ज्ञांचा दावा – जुलैपर्यंत कोरोना पूर्णपणे संपणार, पण….

लवकरच कोरोना संपूर्ण जगभरातून नष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं असलं तरीदेखील काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

अमेरिकी तज्ज्ञांचा दावा - जुलैपर्यंत कोरोना पूर्णपणे संपणार, पण....
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 4:48 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गाचा (coronavirus pandemic) धोका अद्यापही कायम आहे. पण लवकरच कोरोना संपूर्ण जगभरातून नष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं असलं तरीदेखील काळजी घेणं महत्त्वाचं आहे. खरंतर, कोरोनाची लस आली आहे. अनेक देशांमध्ये तर लसीकरणाला (vaccination) सुरुवातही झाली आहे. या सगळ्यात जगात कोरोना रूग्णांची संख्या 830 दशलक्षच्या पुढे गेली आहे. यामध्ये तब्बल 5 कोटी 88 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर 18 लाख 10 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण, या सगळ्या जीवघेण्या प्रवासात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकन तज्ञांनी कोरोना लवकरच संपणार असल्याचा दावा केला आहे. (coronavirus pandemic end till jully proper vaccination claims by america expert anthony fauci)

सगळ्यात जास्त लसीकरणाची गरज

अमेरिकी तज्ज्ञ आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख सदस्य डॉक्टर फौसी यांनी एका खास मुलाखीतमध्ये यासंबंधी माहिती दिली आहे. फॉसी यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा सर्वाधिक परिणाम हा अमेरिकेवर झाला आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात लसीकरण अत्यंत महत्वाचं आहे. इतकंच नाही तर लसीकरणाद्वारेच कोरोना मुळापासून दूर केला जाऊ शकतो. त्यामुळे जुलै 2021 पर्यंत सगळं काही ठीक होण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

फौसी पुढे म्हणाले की, अमेरिका आणि जगातील बरेच देश एप्रिल 2021 पर्यंत मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू करतील. तसा त्याचा परिणामही दिसून येईल. यामुळे एप्रिल ते जुलै हे महिने सगळ्याच देशांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. कारण या दरम्यान, कोरोना पूर्णपणे नष्ट होऊ शकतो असा दावा फौसी यांनी केला आहे.

जुलैपर्यंत सगळं काही सुरळीत होणार

डॉक्टर फौसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलैपर्यंत कोरोना आटोक्यात येऊन सगळं काही सुरळीत होऊ शकतं. त्यामुळे जुलैमध्ये शाळा, थिएटर, स्पोर्ट्स क्लब्स आणि हॉटेल्स आधीसारखे सुरू होतील असा दावाही त्यांनी केली आहे. पण यासगळ्यासाठी कोरोनाच्या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. लसीकरणामध्ये आणि आरोग्याची काळजी घेण्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा होता कामा नये. यासाठी प्रत्येकाने आवश्यक ती काळजी घेणं महत्त्वाचं आहे. (coronavirus pandemic end till jully proper vaccination claims by america expert anthony fauci)

संबंधित बातम्या – 

Corona Vaccine Dry Run | नव्या वर्षात सर्व राज्यात कोरोना लसीची ड्राय रन, केंद्राचा मोठा निर्णय

कोरोना लस टोचल्यानंतरही साईड इफेक्ट झाल्यास मेडिक्लेमचे पैसे मिळणार? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…..

Covishield vaccine A to Z | कोव्हिशिल्ड लसीचे किती डोस तयार, तुम्हाला कशी आणि किती रुपयात मिळणार?

(coronavirus pandemic end till jully proper vaccination claims by america expert anthony fauci)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.