तुमच्यापर्यंत लस कशी पोहोचणार, वॅक्सिनचा साठा ते लसीकरण 4 राज्यात रंगीत तालीम

पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये याची ड्राय रन (मॉक ड्रील) आयोजित करण्यात आली आहे.Corona Vaccine Supply Dry Run

तुमच्यापर्यंत लस कशी पोहोचणार, वॅक्सिनचा साठा ते लसीकरण  4 राज्यात रंगीत तालीम
CORONA VACCINE
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 4:25 PM

नवी दिल्ली: जगात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन आता वर्ष उलटून गेलं आहे. ब्रिटन, कॅनडा, अमेरिका या देशांनी कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. त्या देशांमध्ये कोरोना लसीकरण सुरु झालंय. भारत सरकार नव्या वर्षात कोरोना लसीच्या वापराल मंजूर देऊ शकते. लसीकरणासाठी देशात मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. यानिमित्त पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये याची रंगीत तालीम (मॉक ड्रील) आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त कोरोना लसीकरणाचा साठा ते लसीकरण करण्यात येणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेची चाचणी करण्यात येणार आहे. (Corona Vaccine Supply Dry Run organized in Punjab, Gujrat)

भारत सरकारकडे सीरम इनस्टिट्यूट, भारत बायोटेक आणि फायझर बायोएनटेकने लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. केंद्र सरकारकडून जानेवारी महिन्यात कोरोना लसीला मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकारला लसीचे डोस मिळू शकतात. कोरोना लस मिळाल्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया मोठी आहे. कोरोना वॅक्सिनचा साठा, राज्यांना लसीचे वितरण, जिल्हा, शहर आणि गाव पातळीवर कोरोना लस पोहोचवणं आव्हानात्मक आहे.

गुजरात, पंजाब, आंध्र प्रदेश आणि आसाम मध्ये दोन दिवसीय ड्राय रन(मॉक ड्रील)चं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये पुढील प्रमाणं प्रक्रिया राबवण्यात येईल.

  1. कोरोना लस वेगवेगळ्या जिल्ह्यांत पाठवण्याची तयारी
  2. वॅक्सिन पोहोचवताना तापमान काय ठेवणे, वारंवार तापमानाची चाचणी करणं गरजेचे आहे. वेगवेगळ्या कोरोना लसी साठवण्यासाठी वेगळे तापमान असणार आहे.
  3. कोरोना लसीकरण सुरु असताना ज्यांना लस देण्यात येणार आहे, त्यांना कोरोना लसीकरणासाठीचा मेसेज पाठवला जाणार आहे.
  4. लसीकरण करणाऱ्या टीमची माहिती, वेळ आणि ठिकाणाचा उल्लेख त्या मेसेजमध्ये असेल.

कोरोना लसीच्या वितरणासाठी CoWin हे अ‌ॅप तयार करण्यात आलं आहे. या अ‌ॅपची चाचणी ड्राय रनमध्ये केली जाणर आहे. ड्राय रनमध्ये ज्या अडचणी येतील, वेळ लागेल आणि जो अनुभव येईल त्याचा रिपोर्ट तयार केला जाणार आहे. रिपोर्टमध्ये येणाऱ्या अडचणींवर राष्ट्रीय पातळीवर चर्चा करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या:

ब्रिटनमध्ये कोरोनाचा आणखी एक घातक अवतार, वेगवान संसर्गामुळे खळबळ

कोरोनाच्या नव्या घातक प्रजातीवर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, युरोपीय देशांना विशेष सूचना

(Corona Vaccine Supply Dry Run organized in Punjab, Gujrat)

Non Stop LIVE Update
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.