पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी मिलिट्री बेसवर तहरीक-ए-तालिबानचा कब्जा, ऑपरेशनचा व्हिडीओ जारी
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानमधील बाजौर जिल्ह्यातील लष्करी तळावर कब्जा केला आहे. हा हल्ला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या तणावाचा भाग आहे. टीटीपीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे, तर पाकिस्ताननेही या घटनेची पुष्टी केली आहे. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच बिघडण्याची भीती आहे. पाकिस्तानने अलीकडेच अफगाणिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केले होते, ज्यामुळे हा प्रतिहल्ला झाला असण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. विशेष म्हणजे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेने खैबर पख्तूनख्वा येथील बाजौर जिल्ह्यातील सालारजई परिसरात सैन्य तळावर कब्जा केला आहे. टीटीपीने दावा केला आहे की, त्यांनी 30 डिसेंबर 2024 च्या सकाळी पाकिस्तानच्या मिलिट्री बेसवर ताबा केला आहे. टीटीपीच्या दहशतवाद्यांचा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांच्या डुरंड बॉर्डर येथून येऊन पाकिस्तानच्या मिलेट्री बेसवर कब्जा करताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानकडूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
पाकिस्तानी मीडियाने एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याचा हवाला देत संबंधित लष्करी तळाला टीटीपीच्या हल्ल्याआधीच खाली करण्यात आलं होतं, असं सांगितलं आहे. संबंधित मिलेट्री बेसमधील सैनिकांना सुरक्षितस्थळी मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर असल्यास्थळी स्थलांतरित करण्यात आलं होतं. पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संबंधित घटना ही केवळ बाजौरपर्यंत मर्यादीत नाही तर उत्तर आणि दक्षिण वजीरिस्तानमध्ये देखील काही मिलेट्री बेस खाली करुन सैनिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.
📹🇦🇫🇵🇰 Footage Allegedly Shows Moment Taliban Forces Take Over Pakistani Outpost & Raise Flag https://t.co/ryVVVjbsBb pic.twitter.com/CecbtupMsW
— RT_India (@RT_India_news) December 30, 2024
पाकिस्तानच्या एअर स्ट्राईकला टीटीपीचं प्रत्युत्तर?
पाकिस्तानकडून काही दिवांसापूर्वी अफगाणिस्तानच्या पाक्तिका प्रांतात एअर स्ट्राई करण्यात आला होता. या एअर स्ट्राईकमध्ये 46 लोक मारले गेले होते आणि 6 जण जखमी झाले होते. टीटीपीच्या छावण्यांना निशाणा बनवून संबंधित एअर स्ट्राईक करण्यात आला होता, असा आरोप करण्यात आला होता. पण आपल्याकडून असा कोणाताही एअर स्ट्राईक करण्यात आला नव्हता, असं पाकिस्तानने म्हटलं आहे. या दरम्यान संबंधित एअर स्ट्राईकला प्रत्युत्तर देण्यासाठी टीटीपीने पाकिस्तानी मिलेट्री बेसवर कब्जा केला आहे.
टीटीपीकडून सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानच्या लष्कराने दावा केला आहे की, त्यांनी 13 टीटीपी दहशतवाद्यांना मारलं आहे. पण यामध्ये त्यांचे अनेक सैनिक मारले गेले आहेत. यामध्ये मेजर रँकच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
