AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुर्की आणि अझरबैझान जबर फटका , ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताच्या विरोधात जाणे पडले भारी

‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानला साथ देणे तुर्कीला महागात पडले आहे. तुर्की आणि अझरबैझान असे दोन देश आहेत,ज्यांनी भारत आणि पाक संघर्षात पाकिस्तानचा साथ दिली होती.

तुर्की आणि अझरबैझान जबर फटका , ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताच्या विरोधात जाणे पडले भारी
| Updated on: Oct 19, 2025 | 5:25 PM
Share

ऑपरेशन सिंदुर दरम्याने पाकिस्तानला साथ देणे तुर्कीला भारी पडत आहे. आता मात्र तुर्की आणि अझरबैजानला जाणाऱ्या भारतीयांची संख्या कमी होत गेली आहे. तुर्की आणि अझरबैजान दोन असे देश आहेत, त्यांना मे महिन्यांमध्ये दोन्ही देशातील संघर्षा दरम्याने पाकिस्तानला मदत केली होती. गेल्या काही वर्षात अझरबैझान आणि तुर्की भारतीयांच्या पसंतीचे हॉलिडे डेस्टीनेशन म्हणून पुढे आले होते. दोन्ही देशांदरम्यान थेट विमान सेवा देखील वाढवण्यात आले होत्या. तुर्कीच्या अनेक मोठ्या एअरपोर्ट पैकी एक असलेल्या इस्तंबुल विमानतळावर मोठ्या प्रमाणावर लोक येजा करु लागले होते.

तुर्कीच्या सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मे पासून ते ऑगस्ट दरम्यान तुर्कीला जाणाऱ्या भारतीयांची संख्या एक तृतीयांशाने घटून आता ९०,४०० झाली आहे. गेल्या अनेक वर्षात ही संख्या १.३६ लाख होती. २०२५ च्या सुरुवातीला चार महिन्यात सुमारे ८३,३०० भारतीयांना तुर्कीचा दौरा केला होता. जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील प्रवाशांच्या ( ८४,५०० ) संख्येपेक्षा थोडी कमी आहे. ही संख्या हळूहळू कमी होती चालली आहे.

भारतीयांनी शिकवला धडा

भारताच्या गरजेच्या वेळी नेहमी तुर्कीला मदत केलेली आहे. परंतू ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानला मदत करण्याची त्यांची ही कृती भारतीयांना आवडली नाही. त्यामुळे भारतीयांना तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्कार करणे सुरु केले आहे. याचा परिणाम मे महिन्यापासून दिसू लागला होता. जेव्हा भारतीयांनी धडाधड बुकींग कॅन्सल करणे सुरु केले. अनेक मोठ्या पर्यटन आणि विमान कंपन्यांनी तुर्की आणि अझरबैजानसाठी फ्लाईट आणि हॉटेल सेवा बंद केली. ऑपरेशन सिंदुर नंतर MakeMyTrip आणि EaseMyTrip सारख्या ट्रॅव्हल पोर्टल्सने देखील या देशांची अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला.

तुर्की आणि अझरबैजानला

अझरबैजान टुरिझ्म बोर्डाने अलिकडे जारी केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी आणि एप्रिल दरम्यान भारतातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत ३३ टक्के वाढ झाली होती. परंतू मे- ऑगस्ट दरम्यान सुमारे ५६ टक्के घसरण झाली. मे आणि ऑगस्ट दरम्यान अझरबैजान जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या घटून जवळपास ४४,००० राहिली आहे. गेल्यावर्षी याच काळात ही संख्या सुमारे १,००,००० इतकी होती. एकूण मिळून २०२५ च्या पहिल्या आठ महिन्यात अझरबैजानला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या साल दर साल २२ टक्के घसरण झाली असून ती आता १.२५ लाख राहिली आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.