AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युएईचा पाकिस्तानला दे दणका, मोठी खळबळ, थेट धक्कादायक निर्णय घेत..

इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जगाला बसत आहे. त्यामध्येच अजून एका देशाने पाकिस्तानला मोठा दणका दिला. पाकिस्तानची वाट लागलेली असतानाच आता पुन्हा पाकिस्तानच्या समस्येत मोठी वाढ झाली. धक्कादायक निर्णय घेण्यात आला.

युएईचा पाकिस्तानला दे दणका, मोठी खळबळ, थेट धक्कादायक निर्णय घेत..
Shehbaz Sharif
| Updated on: May 16, 2026 | 1:56 PM
Share

युनायडेट अरब अमिराती (युएई) आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावात आहेत. भारताने नुकताच युएईसोबत महत्वपूर्ण करार केले. मात्र, पाकिस्तान आणि युएई यांच्यातील तणाव प्रचंड वाढला. युएईचा पाकिस्तानवर मोठा दबाव आहे. मोठा दणका युएईने पाकिस्तानला दिलाय. थेट लो-कॉस्ट एअरलाईन फ्लाईदुबईने पाकिस्तानला दणका देत मोठा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या तीन प्रमुख शहरांमध्ये जाणारी विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. 26 ऑक्टोबरपर्यंत विमानसेवा बंद करण्यात आली. ज्यात लाहोर, इस्लामाबाद आणि पेशावर सामील आहे. एअरलाईनने स्पष्ट केले की, कराचीची सेवा सुरू ठेवण्यात आली. फ्लाईदुबईने जुलै 2024 मध्ये लाहोर आणि इस्लामाबादमध्ये ऑपरेशन सुरू केले होते. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाच्या किमती खूप जास्त वाढल्या आहेत.

सतत या किमतीमध्ये वाढ होत आहे. यादरम्यानच अनेक विमान कंपन्यांनी विदेशातील विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. कच्च्या तेलाचा तुटवडा देखील आहे. युएईच्या एअरलाईन्सने घेतलेल्या या निर्णयाने मोठा धक्का पाकिस्तानला बसला आहे. काही दिवसांपूर्वीच युएईने पाकिस्तानला त्यांनी दिलेल्या 3.5 अरब डॉलरचे कर्ज परत देण्यास सांगितले. यासोबतच त्यांनी पाकिस्तानला मोठा धमकी देखील दिली.

पाकिस्तानचे अगोदरच दिवाळे निघाले असताना युएई पैसे परत करण्याकरिता पाकिस्तानवर दबाव टाकत आहे. युएई एका मागून एक पाकिस्तानला धक्के देताना दिसत आहे. इस्लामाबाद दुबई फ्लाईट नंबर FZ353 आणि FZ354, लाहोर दुबई फ्लाईट नंबर FZ359 आणि FZ360, पेशावर दुबई फ्लाईट नंबर FZ375 आणि FZ376 या विमाने युएईच्या एअरलाईन्सने बंद करण्याचा निर्णय घेतला.

इराण आणि अमेरिका युद्धात ऊर्जेचे मोठे संकट निर्माण आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडीत तणाव आहे. होर्मुज खाडी पार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या जहाजांवर मोठे हल्ले केले जात आहेत. त्यामध्येच अनेक विमान कंपन्यांकडून विमानसेवा थेट काही दिवसांकरिता बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा सर्वात जास्त फटका पाकिस्तानला बसताना दिसत आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप